Russia-Ukraine War: युक्रेनवर रशियाचा भीषण ड्रोन हल्ला; 3 ठार, 21 जखमी तर इमारतींचे मोठे नुकसान
Russia-Ukraine War: नैऋत्य युक्रेनमधील ओडेसा बंदराच्या परिसरात रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन जण जखमी झाले. प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात निवासी इमारती, बंदराच्या पायाभूत सुविधा आणि गाड्यांचे नुकसान झाले, अशी माहिती प्रादेशिक प्रमुख ओलेह किपर यांनी शनिवारी दिली.

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनमधीलनिप्रो प्रांतात केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात ३ जण ठार झाले असून किमान २१ लोक जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. रात्रीच्यावेळी रशियाने केलेल्या माऱ्यामध्ये घराच्या ढिगाऱ्याखाली तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत, असे निप्रोपेट्रोवस्त्सचे प्रादेशिक प्रमुख ओलेकासांद्र गांझा यांनी सांगितले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर निप्रो येथील रुग्णालयात ११ जणांना दाखल करण्यात आले असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियाकडून निप्रो आणि अन्य शहरांवर, तसेच रहिवासी समुदायांवर रात्रीच्यावेळीच मारा केला जातो आहे, असे गांझा यांनी टेलिग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर निप्रो प्रांतात काही ठिकाणी आग लागली आणि काही अपार्टमेंट, उद्योग आणि घरांच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
नैऋत्य युक्रेनमधील ओडेसा बंदराच्या परिसरात रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन जण जखमी झाले. प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात निवासी इमारती, बंदराच्या पायाभूत सुविधा आणि गाड्यांचे नुकसान झाले, अशी माहिती प्रादेशिक प्रमुख ओलेह किपर यांनी शनिवारी दिली.
दोन्ही देशांमधील कैद्यांची आदलाबदल –
रशियातील बेलगोरोडच्या सीमावर्ती भागात युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी रशिया आणि युक्रेनच्या १९३ कैद्यांची आदलाबदल करण्यात आली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असले आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता वाटाघाटींना अद्याप यश आलेले नाही. तरी नियमितपणे कैद्यांची आदलाबदल होते आहे, ही एक सकारात्मक बाब आहे.





