Russia Ukraine War : झेलेन्स्की यांचा चर्चेचा प्रस्ताव पुतीन यांनी फेटाळला; युक्रेनकडून पुन्हा सेंट पीटर्सबर्गवर हल्ला
या हल्ल्यामुळे सेंट पीटर्सबर्गमधील रहिवाशांना घराबाहेर न पडण्याची सूचना स्थानिक प्रशासनाने केली आहे. रशियाच्या (Russia Ukraine War) हद्दीत खोल आतपर्यंत मारा करण्याची क्षमताच युक्रेनने या हल्ल्यातून दाखवून दिली आहे.

Russia Ukraine War : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याबरोबर थेट समोरासमोर चर्चा करण्याबाबत युक्रेनचे अध्यक्ष यांनी मांडलेला प्रस्ताव पुतीन यांनी फेटाळला आहे. त्यामुळे युक्रेनने (Russia Ukraine War) शनिवारी सकाळी पुन्हा एकदा सेंट पीटर्सबर्ग या रशियातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरावर ड्रोन हल्ला केला आहे.
या हल्ल्यामुळे सेंट पीटर्सबर्गमधील रहिवाशांना घराबाहेर न पडण्याची सूचना स्थानिक प्रशासनाने केली आहे. रशियाच्या (Russia Ukraine War) हद्दीत खोल आतपर्यंत मारा करण्याची क्षमताच युक्रेनने या हल्ल्यातून दाखवून दिली आहे.
युक्रेनच्या संभाव्य ड्रोन हल्ल्यांमुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर अलेक्झांडर बेगलोव्ह यांनी नागरिकांना केली आहे. तसेच मोबाइल इंटरनेटही स्थगित केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
युक्रेनने डागलेली १४१ ड्रोन लेनिनग्राडच्या परिसरामध्ये पाडण्यात आली असे प्रादेशिक गव्हर्नर अलेक्झांडर द्रोझदेन्को यांनी सांगितले. तर हवाई संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे ३७६ ड्रोन पाडले, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. तर युक्रेनच्या ड्रोननी १ हजार किलोमीटरचा हवाई पल्ला पार करत सेंट पीटर्सबर्गमधील शत्रूच्या नौदलाच्या ठिकाणांवर आणि क्रोन्स्तादत येथील तळावर हल्ला केला, असे झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
युक्रेनच्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी युद्धाचा फटका रशियातल्या नागरिकांना बसू नये, यासाठी पुतीन यांनी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना मोठा हादरा बसला आहे. बुधवारी सेंट पीटर्सबर्गमधील आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचची बैठक सुरू होण्यापुर्वी युक्रेनने सेंट पीटर्सबर्गवर केलेल्या हल्ल्यात तेलाच्या टर्मिनलला आग लागली होती.
युक्रेनच्या हल्ल्यांना (Russia Ukraine War) रोखण्यासाठी रशियाची हवाई संरक्षण प्रणाली सज्ज असल्याचे पुतीन म्हणाले होते. युक्रेनमध्ये, शनिवारी पहाटेच्या सुमारास निप्रोपेत्रोव्स्क प्रदेशात रशियन सैन्याने ड्रोनद्वारे तीन जिल्ह्यांवर जवळपास ३० वेळा हल्ला केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.
परिणाम रशियासाठी वाईट असेल…
रशियाने चार वर्षांपुर्वी युक्रेनवर हल्ला केल्यापासून प्रथमच झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याशी थेट चर्चेचा प्रस्ताव खुल्या पत्राद्वारे दिला होता. पण या प्रस्तावाचा विचार करता येणार नाही, असे पुतीन म्हणाले. पण या नकाराचा परिणाम रशियावरच होईल, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेइ सिबिहा यांनी म्हटले आहे. पराभव अधिक अपमानकारक असेल. युक्रेनच्या लांब पल्ल्यांच्या ड्रोनपासून वाचण्यासाठी रशियामध्ये कोणतीही सुरक्षित जागा शिल्लक असणार नाही, असे ते म्हणाले.






