Russia Developed Cancer Vaccine: कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर औषध शोधण्याचे काम मोठ्या स्तरावर संशोधकांकडून केले जात आहे. मात्र, या आजारावर ठोस उपाय अद्याप सापडलेला नाही. त्यातच आता रशियाने या भयानक आजारावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतचा दावा केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, कॅन्सरवरील लस तयार करण्यात आली असून, नागरिकांना याचे मोफत वाटप केले जाईल. आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख एंड्री काप्रिन यांनी माहिती दिली की, वर्ष 2025 मध्ये या लसीचे डोस देण्यात सुरूवात केली जाईल. रिपोर्टनुसार, या लसीचा वापर कॅन्सरने ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाईल. मात्र, ही लस आजारावर कशा पद्धतीने काम करेल व किती प्रभावी ठरेल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, या लसीला अद्याप कोणतेही नाव देखील देण्यात आलेले नाही. रशियात कॅन्सरने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ गेल्याकाही वर्षात रशियातील कॅन्सर झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. वर्ष 2022 मध्ये कॅन्सर झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाखांच्या पुढे होतील. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देखील याबाबत काही दिवसांपूर्वी माहिती दिली होतील. कॅन्सरवरील लस व नवीन इम्यूनोमॉड्यूलेटरी औषधांच्या निर्मितीच्या खूपच जवळ पोहोचलो असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तसेच, सध्या काही ठराविक कॅन्सरवर अधिकृत लस उपलब्ध आहे. ह्यूमन पेपिलोमाव्हायरस (एचपीव्ही), हेपेटायटिस बी यामुळे होणाऱ्या कॅन्सरला रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे.