रुपया 28 पैशांनी घसरून 87.46 रुपये प्रति डॉलर
Updated On:

मुंबई – रिझर्व बँकेने बराच हस्तक्षेप करूनही शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत असल्यामुळे आणि परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे शुक्रवारी रुपयाचा भाव 28 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 87 रुपये 46 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध आणखी भडकविले आहे.
चीनवर अगोदरच दहा टक्के आयात शुल्क लावले असताना आणखी दहा टक्के आयात शुल्क लावले जाणार आहे. तसेच पुढील आठवड्यापासून मेक्सिको आणि कॅनडावरील आयातीवर शुल्काची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा परिणाम जागतिक चलन बाजारावर झाला.
टॅग्स:





