Supriya Sule : रुपाली चाकणकरांचे डॅा. खेवलकरांवर खळबळजनक आरोप; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न म्हणाल्या…

Supriya Sule : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले डॅा. प्राजंल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होते असून, पोलिसांना खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मिळून आले होते. आता या प्रकरणात महिला आयोगाने एन्ट्री केली असून, अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत डॅा. खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
डॉ. प्राजंल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडीओ क्लिप्स, फोटो आणि अन्य माहिती बाबत त्यांनी जाहीरपणे खळबळजनक आरोप केले आहेत. आता या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुळे यांनी याबाबत पोलिसांची कार्यपद्धती आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या उल्लंगणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून उघडपणे कायद्याचे उल्लंघन झाले आहे, असे देखील सुळे म्हणाल्या. दिल्लीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राईट टू प्राईव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे. कोणाचाही मोबाईल पोलिसांनी घेतला तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो बाकी कोणालाही हा अधिकार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तो बाहेर लीक केला तर गुन्हा आहे, अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. मी कोणाला डिफेंड करत नाही, काय करायंच, नियमाप्रमाणे चालायंच की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न
या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न केला आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे कतृत्त्ववान वकील आहेत. माझ्यापेक्षा त्यांना या गोष्टी जास्त माहिती आहेत. त्यामुळे काय कारवाई करायची हे सरकारने ठरवावं, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : Raksha Bandhan: “गिफ्टच्या रॅपर मध्ये भावना गुंडाळा: रक्षाबंधन साठी हटके पर्याय”





