सर्वात मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Rupali Chakankar Resigns : नाशिकमधील अशोक खरात बलात्कार प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Updated On:
सर्वात मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Rupali Chakankar Resigns : राज्यातील राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अशोक खरात प्रकरणानंतर वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे खरातचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका वाढली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत होती. अखेर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त अधिकारी आहे. अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती.

अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असल्याची माहिती आहे. मात्र, नाशिकमधील एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ ने १८ मार्च रोजी पहाटे ३ वाजता त्याला अटक केली.

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खरातच्या ताब्यातून पोलिसांनी एक पेनड्राइव्ह जप्त केला असून त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

चाकणकर आणि खरात यांचा संबंध काय?

अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या एका फोटोत अशोक खरात यांच्या ‘श्री शिवनिका संस्थान, मिरगांव’ या संस्थेत रुपाली चाकणकर यांचे नाव सदस्या म्हणून नमूद असल्याचे दिसते. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले की, चाकणकर या खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत होत्या. खरातच्या घरच्या लग्न कार्यातही चाकणकर जातीने उपस्थित होत्या.

आणखी संबंधित बातम्या

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

2026-10-05 18:22:37

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

2026-10-05 17:12:54

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर