Rupali Patil Thombre post : रुपाली चाकणकर फरार… ; रुपाली पाटील ठोंबरेंची खळबळ उडवून देणारी पोस्ट
Rupali Patil Thombre post : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने खळबळ उडाली आहे.

Rupali Patil Thombre post : नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. स्वतःला ज्योतिष म्हणून घेत महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप खरातवर आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. अशोक खरात याचे अनेक राजकीय नेते मंडळींसोबत कनेक्शन असल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच विविध कार्यक्रमातील खरात आणि चाकणकर यांचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर अडचणी सापडल्या आहेत. विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याचदरम्यान, रुपाली चाकणकरांच्याच पक्षातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार…बजाव ताली…अशी पोस्ट त्यांनी केली आहे. Rupali Patil Thombre post
दरम्यान, अशोक खरात प्रकरणी काल रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नाशिकमधील विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही हा महिलांचा आहे. खरंच ट्रस्टवर राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. Rupali Patil Thombre post
त्यामुळे पोलीस कारवाई करत नव्हते का? 58 व्हिडीओ आहेत म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? असे संपप्त सवाल त्यांनी उपस्थित केले होते. रुपाली चाकणकर राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्या पाहिजे. त्याशिवाय तपास पूर्ण होणार नाही, अशी मागणी देखील रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती.
त्या असेही म्हणाल्या होत्या की, चाकणकर त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार. मी सुनेत्रा पवारांच्या कानावर हा विषय टाकणार आहे. चाकणकरांनी राजीनामा नाही दिला तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार, असा इशारही त्यांनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय? Rupali Patil Thombre post
स्वतःला ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणवणारा व्यक्ती अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत असून, प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून, एसआटी स्थापन केली आहे.
पोलिसांनी खरातच्या घरात झडती घेतल्यानंतर पिस्तूल आणि कागदपत्रे मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय धक्कादायक बाब अशी की पोलिसांना कारवाईत 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. Rupali Patil Thombre post
काही व्हिडिओंमध्ये प्रभावशाली व्यक्तींचा उल्लेख असल्याची चर्चा होत आहे. न्यायालयाने अशोक खरात याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते हे पाहावे लागेल.
हेही वाचा : Narayangaon News : नारायणगावात पैशांचा पाऊस! एकाच दिवसात ३ कोटींची उलाढाल; काय आहे नेमकं प्रकरण?





