Rubina Dilaik: रुबिना दिलैकचे प्रेग्नंसी फोटोशूट, हटके अंदाज पाहून चाहते थक्क

Rubina Dilaik : ‘छोटी बहू’, ‘शक्ती’ या मालिकेतील अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने ही माहिती चाहत्यांना दिली होती. नुकतेच तिने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. पांढऱ्या रंगाच्या हटके लूकमध्ये तिने केलेले हे फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे.
रुबिनाच्या मॅटर्निटी फोटोशूटची थीम व्हाईट आहे. या फोटोशूट साठी रुबिनाने आणि पती अभिनव शुक्ला दोघांनी पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अनिभवने पांढरा टी-शर्ट, त्यावर पांढरा कोट आणि पँट घातलेली दिसत आहे. या लूकमध्ये दोघेही सुंदर दिसत आहे. रुबिनाने हे फोटो शेअर करत ‘माझ्या आयुष्यातील चमत्कार ज्याचं मी शब्दात वर्णनही करु शकत नाही’ असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रुबिना गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांनंतर तिने स्वत: पुढे येत इनस्टाग्राम पोस्टद्वारे ती लवकरच आई होणार असल्याचे सांगितले होते. तिच्या पोस्टनंतर तिच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता.
बिग बॉस-14’ची विजेती रुबीना ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती चाहत्यांशी आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सप्टेंबर महिन्यात तिने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही चांगलेच पसंतीस पडले होते.





