प्रभात वृत्तसेवा कामशेत – विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथ संचलन करण्यात आले. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले होते.संघाचे सघोष संचलन उत्साहात पार पडले. जिमी मस्त्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गणेश मंगल कार्यालय येथे स्वयंसेवक एकत्र येऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. भगव्या ध्वजाला वंदन करून आणि संघ प्रार्थना म्हणून संचलनाला प्रारंभ झाला. भगवा ध्वज, स्वयंसेवकांच्या रांगा अशा शिस्तबद्ध पद्धतीने संचलन निघाले. शहरातील मार्गांवर जाऊन हे संचलन परत गणेश मंगल कार्यलय येथे आले.संचलन मार्गावर जागोजागी नागरिकांनी रांगोळ्या काढून आणि स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. शहरातील ५०० हून अधिक स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. भारतीय वाद्यांचे घोषपथक आणि त्यांनी वाजवलेल्या विविध रचना हे या संचलनाचे आकर्षण ठरले. या वेळी वक्ते म्हणून मधुकर मोरे यांनी संघ शताब्दी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.