संघाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा इस्राेच्या दोन माजी अध्यक्षांची उपस्थिती

RSS Dasara Vijaya Dashami । आज नागपुरातील रेशीम बाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे. सकाळी रेशीमबाग मैदानावरील मुख्य सोहळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी संघाच्या स्वयंसेवकांचा रेशीम बाग आणि जवळपासच्या परिसरात पथसंचलन होणार आहे. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन हे संगम टॉकीज जवळ स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचं अवलोकन करणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुका व संघाचे शतकोत्तर वर्षात पदर्पण, या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवावर यंदा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्राे) दोन माजी अध्यक्षांनी उपस्थित दर्शवली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्राे) माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित आहेत. सरसंघचालकानी त्यांचे स्वागत केले. यासोबतच इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांचीही उपस्थिती आहे. याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदल, भारतीय विदेशी सेवेतील भावना विच, नरा लिया आदींची उपस्थिती आहे.
दरम्यान , यावर्षीच्या विजयादशमी सोहळ्याला भाजपच्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सायंकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली होती. तर कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींची उपस्थिती आहे.





