Nagar | धनादेश वटला नसल्याने ६० हजाराचा दंड

शेवगाव, – कर्जाच्या थकबाकीपोटी दिलेला धनादेश वटला नाही, म्हणून श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को. आप.अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेने अहिल्यानगर येथील न्यायालयात दावा दाखल केला. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आय. एम.नाईकवाडी यांनी कर्जदार व्यक्तीस ६० हजार रुपये दंड व एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
बाळासाहेब दादा शेजवळ (रा. येवला, जि. नाशिक) याने श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑफ अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या येवला शाखेतून सहा डिसेंबर २०२२ ला एक लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जदार शेजवळ याने कर्जाची काही रक्कम भरल्यानंतर थकीत रकमेसाठी २३ एप्रिल २०२३ ला एचडीएफसी बँकेचा ४५ हजार ६०० रुपयाचा धनादेश संस्थेला दिला होता. मात्र, हा धनादेश वला गेला नसल्याने श्री रेणुकामाता मल्टीस्टेट संस्थेच्या वतीने धीरज आव्हाड यांनी अहिल्यानगर न्यायालयात शेजवळ यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती.
त्यावर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नाईकवडी यांनी शेजवळ यास साठ हजार रुपये दंड व एक महिना सश्रम कारावास, दंड न भरल्यास सात दिवसांचा कारावास अशी शिक्षा सुनावली.





