RR vs MI : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL 2025 मधून पडला बाहेर

RR vs MI Vignesh Puthur ruled out of IPL 2025 : मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ च्या हंगामात २४ वर्षीय डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरच्या रूपात मोठा धक्का बसला आहे, जो दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. हा विघ्नेश पुथूरचा पहिला आयपीएल हंगाम होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. विघ्नेश पुथूरला बाहेर झाल्यानंतर मुंबईने त्याच्या जागी घेतलेल्या बदली खेळाडूचे नावही जाहीर केले आहे.
विघ्नेशची जागा रघु शर्मा घेणार –
विघ्नेश पुथूर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाल्याने, मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी लेग-स्पिनर रघु शर्माला त्यांच्या संघात स्थान दिले आहे. रघुने पंजाब आणि पुद्दुचेरीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे, ज्यामध्ये त्याने ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९.५९ च्या सरासरीने एकूण ५७ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ५६ धावांमध्ये ७ विकेट्स आहे.
Get well soon, Vignesh 🥹
Your #OneFamily wishes you a speedy recovery & we can't wait to see you back on the field soon 💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/Yej0ylKT6z
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2025
रघु शर्माने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ९ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. रघुने आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये तीन विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. मुंबई इंडियन्स संघाने रघु शर्माला त्याच्या ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर संघात स्थान दिले आहे. विघ्नेश पुथूरबद्दल बोलायचे तर त्याने एकूण ५ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १८.१७ च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या.
मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान –
𝐑𝐚𝐠𝐡𝐮 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚 𝐫𝐞𝐩𝐥𝐚𝐜𝐞𝐬 𝐕𝐢𝐠𝐧𝐞𝐬𝐡 𝐏𝐮𝐭𝐡𝐮𝐫 𝐚𝐭 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧𝐬 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐫𝐞𝐬𝐭 𝐨𝐟 #TATAIPL 𝟐𝟎𝟐𝟓 𝐬𝐞𝐚𝐬𝐨𝐧.
📰 Read more ➡ https://t.co/n9MJ7PvqlQ#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/a9Ia6XxLlZ
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2025
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२५ च्या हंगामात खेळणाऱ्या मुंबईसाठी सुरुवातीचे काही सामने अपेक्षेनुसार झाले नसतील, परंतु गेल्या ५ सामन्यांमध्ये सलग विजय मिळवून मुंबई संघाने शानदार पुनरागमन केले आहे, ज्यामध्ये त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. जो १ मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल.





