RR vs MI : मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय! राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

RR vs MI Mumbai Indians beat Rajasthan Royals by 100 runs : आयपीएल २०२५ मधील ५०वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पाडला. या सामन्यात मुंबईने राजस्थानचा १०० धावांनी पराभव करत १३ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय नोंदवला. याआधी या स्टेडियमवर मुंबईने राजस्थानविरुद्ध २०१२ मध्ये शेवटचा विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २ बाद २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ १६.१ षटकांत ११७ धावांवर गारद झाला.
मुंबईचा १३ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय –
ज्यामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा सीएसकेनंतर दुसरा संघ ठरला आहे. यंदाच्या हंगामाात मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खूपच वाईट झाली होती, पण आता मुंबईने सलग ६ सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक गमावली होती, पण त्यानंतर त्यांनी खेळाच्या प्रत्येक विभागात या संघावर आघाडी घेतली.
Deepak Chahar sprints, dives, and delivers 👊
Karn Sharma gets his 3rd wicket of the night 💙
Updates ▶ https://t.co/t4j49gXHDu#TATAIPL | #RRvMI | @mipaltan pic.twitter.com/9kaHuBRp3J
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि रोहित आणि रिकल्टन यांनी त्यांच्या फलंदाजीने डावाला दमदार सुरुवात करुन दिली. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. रिकल्टनने फक्त ३८ चेंडूत ६१ धावा केल्या तर रोहितने ३६ चेंडूत ५३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या दोघांनीही २३ चेंडूत ४८-४८ धावा केल्या.
हेही वाचा – Khel Ratna Award : बॅडमिंटन जोडीचा सन्मान: सात्विक-चिराग यांना खेलरत्न पुरस्कार प्रदान
बुमराह-बोल्ट आणि कर्ण यांची शानदार गोलंदाजी –
Bowling Do𝗠𝗜nation 🔥
Every spell, every over has been on point from the #MI bowlers 👊#RR are 82/7 after 10 overs.
Updates ▶️ https://t.co/t4j49gXHDu#TATAIPL | #RRvMI | @mipaltan pic.twitter.com/hXoMcWtFIr
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
राजस्थान रॉयल्सना आशा होती की ते मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटन्ससारखीच फलंदाजी कामगिरी करतील पण बोल्ट आणि बुमराहने ही आशा धुळीस मिळवली. प्रथम, दीपक चहरने वैभव सूर्यवंशीला शून्यावर बाद केले आणि नंतर बोल्टने यशस्वी जैस्वाल आणि नितीश राणाला बाद केले. त्यानंतर बुमराह आला आणि त्याने राजस्थानचा कर्णधार रियान परागला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पुढच्याच चेंडूवर शिमरॉन हेटमायरही बाद झाला.
हेही वाचा – Sandeep Sharma : राजस्थानला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे IPL 2025 मधून बाहेर
राजस्थानने पॉवरप्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्या आणि त्यानंतरही त्यांच्या अडचणी संपल्या नाहीत. हार्दिक पंड्याने शुभम दुबेला बाद करून राजस्थानची शेवटची आशा संपवली. लेग स्पिनर कर्ण शर्माने उर्वरित काम पूर्ण केले. त्याने ध्रुव जुरेलला ११ धावांवर बाद केले आणि महेश थीक्शना आणि कुमार कार्तिकेय यांच्याही विकेट्स घेतल्या. शेवटी, बोल्टने आर्चरला बाद केले आणि राजस्थानचा डाव ११७ धावांवर संपवला. अशा प्रकारे मुंबईने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.





