RR vs LSG : रोमांचक सामन्यात लखनौने राजस्थानच्या तोंडातून हिसकावला विजय, आवेश खान ठरला गेम चेंजर,

RR vs LSG Lucknow Super Giants beat Rajasthan Royals by 2 runs : आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची खराब कामगिरी सुरूच आहे. सलग दुसऱ्या सामन्यात विजयी स्थितीत असूनही संघाचा पराभव झाला. लखनौ राजस्थानवर शेवटच्या चेंडूवर २ धावांनी विजय मिळवला. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटच्या षटकात ९ धावा काढण्यात अपयशी ठरलेल्या राजस्थानला पुन्हा एकदा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले, जेव्हा संघ पुन्हा शेवटच्या षटकात ९ धावा करू शकला नाही. यावेळी अवेश खानने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सामना त्यांच्याकडून हिसकावून घेतला.
रोमांचक सामन्यात लखनौने राजस्थानच्या तोंडातून हिसकावला विजय –
जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून, सलामीवीर एडेन मारक्रम आणि मधल्या फळीतील फलंदाज आयुष बदोनी यांनी दमदार अर्धशतके झळकावली, तर अब्दुल समदने शेवटच्या षटकात 4 षटकार मारून संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरादाखल, राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने शानदार अर्धशतक झळकावले. तर १४ वर्षीय वैभवने पदार्पण करत असताना, त्यानेही शानदार फलंदाजी केली. पण पुन्हा एकदा त्याचे फिनिशर संघाला सामना जिंकून देऊ शकले नाहीत. राजस्थानचा संघ निर्धारित षटकात ५ विकेट्स गमावून १७८ धावाच करु शकला.
Absolutely 🔥 🔥 🔥
Avesh Khan delivered a yorker masterclass when it mattered most, and just like that, #LSG pull off a 2-run thriller!
How do you even rate that spell of magic?! 🔥
Scorecard ▶️ https://t.co/02MS6ICvQl#TATAIPL | #RRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/1UKViGuhUl
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2025
लखनौचे सलामीवीर ठरले फ्लॉप –
या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. जवळजवळ प्रत्येक सामन्यात संघाला चांगली सुरुवात देणारा सलामीवीर मिचेल मार्श आणि या हंगामातील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून सिद्ध होणारा निकोलस पूरन यांनाही काही विशेष कामगिरी करता आली नाही. दोघेही पॉवर प्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतले. पण फॉर्ममध्ये परतलेला दुसरा सलामीवीर एडेन मारक्रमने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आणि हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले.
हेही वाचा – RR vs LSG : वैभव सूर्यवंशीचा पदार्पणातच धमाका! पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत रचला इतिहास
मारक्रम-बदोनीच्या भागीदारीने लखनौला सावरले –
त्याच वेळी, आयुष बदोनीनेही शानदार अर्धशतक झळकावले. दोघांमधील ७६ धावांच्या भागीदारीने लखनौला नियंत्रणात ठेवले. पण कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. लखनौ संघ मोठा धावसंख्या गाठेल असे वाटत नव्हते पण अब्दुल समदने शेवटच्या षटकात ४ षटकार मारून संघाला या धावसंख्या गाठून दिले. राजस्थानकडून फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – RR vs LSG : वैभव सूर्यवंशीने केला ऐतिहासिक पराक्रम! आयपीएलच्या इतिहासातील ठरला सर्वात तरुण पदार्पणवीर
आवेश खान ठरला गेम चेंजर –
Heart-racing, nerve-wracking, and simply unforgettable! 🤯#LSG defy the odds and seal a 2-run victory over #RR after the most dramatic final moments 💪
Scorecard ▶️ https://t.co/02MS6ICvQl#TATAIPL | #RRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/l0XsCGGuPg
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2025
राजस्थानला शेवटच्या ३ षटकांत फक्त २५ धावांची आवश्यकता होती आणि येथूनच आवेश खानने संघाची बाजू उलटायला सुरुवात केली. त्याने १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जैस्वालला बाद केले आणि नंतर शेवटच्या चेंडूवर रियान परागला एलबीडब्ल्यू आऊट केले. ६ चेंडूत दोन सेट फलंदाज गमावल्यानंतर राजस्थान अडचणीत सापडलेले दिसत होते. १९ व्या षटकात शिमरॉन हेटमायरने २ चौकार मारले, त्यानंतर शेवटच्या षटकात फक्त ९ धावांची आवश्यकता होती. आवेश खाननेही मिशेल स्टार्कच्या शैलीत अचूक यॉर्कर मारत राजस्थानला या धावा करू दिल्या नाहीत आणि संघाला १७८ धावांवर रोखून संस्मरणीय विजय मिळवून दिला.





