RR vs CSK : राजस्थानचे रॉयल्स चेन्नईच्या किंग्जवर पडले भारी! नितीश-वानिंदू ठरले गेमचेंजर

RR vs CSK Rajasthan Royals beat Chennai Super Kings by 6 runs : राजस्थान रॉयल्सने नितीशा राणाच्या आणि वानिंदू हसरंगाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. यासह राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ मध्ये विजयाचे खाते उघडले, तर चेन्नई सुपर किंग्जला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई निर्धारित षटकात ६ बाद १७२ धावाच करु शकली.
यंदाच्या हंगामातील राजस्थानचा हा तीन सामन्यांतील पहिलाच विजय आहे. त्याच वेळी, चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. विशेष म्हणजे या विजयासह राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर पोहोचला आहे. तर, सीएसके सातव्या स्थानावर आहे. आरसीबी चार गुणांसह आणि २.२२६ च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवात खराब झाली. त्यांना पहिला धक्का जोफ्रा आर्चरनेच पहिल्याच षटकात दिली. त्याने रचिन रवींद्रला आपला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही.
The situation 🤯
The catch 🫡
The moment 🔝🎥 Shimron Hetmyer's match-changing catch 🙇♂️
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK | @rajasthanroyals pic.twitter.com/ytuCdERVas
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
कर्णधार ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ –
Captain Ruturaj Gaikwad hit a fine fifty tonight 👌
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK | Relive 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
यानंतर, राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेट्ससाठी ३९ चेंडूत ४६ धावांची भागीदारी झाली. त्रिपाठी २३ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, गायकवाडने ४४ चेंडूत ६३ धावा केल्या, त्याच्याशिवाय शिवम दुबेने १८, विजय शंकरने नऊ, महेंद्रसिंग धोनीने १६ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि जेमी ओव्हरटन अनुक्रमे ३२ आणि ११ धावांवर नाबाद राहिले. या सामन्यात राजस्थानकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
नितीश-संजूने दुसऱ्या विकेट्ससाठी केली ८२ धावांची भागीदारी –
A pure 𝐑𝐎𝐘𝐀𝐋ty knock! 👑
Nitish Rana wins the Player of the Match award for his match-winning innings that powered #RR to their first win of #TATAIPL 2025 🩷
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#RRvCSK | @rajasthanroyals | @NitishRana_27 pic.twitter.com/riiRnElkP7
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानने सामन्याची सुरुवात एक विकेट्स गमावून केली. यशस्वी जैस्वाल (४) हा डावाच्या पहिल्याच षटकात खलील अहमदच्या गोलंदाजीवर अश्विनच्या हाती झेलबाद झाला. मात्र, यानंतर नितीश राणा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तो या सामन्यात वेगळ्याच स्वरूपात दिसला. त्याने सलामीवीर संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला संजू सॅमसन १६ चेंडूत २० धावा काढून बाद झाला. त्याला नूर अहमदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
हेही वाचा – RR vs CSK : राजस्थानचे रॉयल्स चेन्नईच्या किंग्जवर पडले भारी! नितीश-वानिंदू ठरले गेमचेंजर
नितीश राणाने साकारली तुफानी खेळी –
त्यानंतर नितीशने कर्णधार रियान परागसोबत २४ चेंडूत ३८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, डावखुरा फलंदाज नितीशने २१ चेंडूत आपले १९ वे अर्धशतक पूर्ण केले. ३६ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी खेळल्यानंतर तो बाद झाला. धोनीने त्याला यष्टीचित केले. १२४ धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर राजस्थानचा डाव डळमळीत झाला. या सामन्यात ध्रुव जुरेलने तीन धावा, वानिंदू हसरंगाने चार धावा आणि कुमार कार्तिकेयने एक धाव केली. दरम्यान, महिश तीक्षना आणि तुषार देशपांडे यांनी अनुक्रमे दोन आणि एक धावा काढून नाबाद राहिले. जोफ्रा आर्चरला त्याचे खातेही उघडता आले नाही. चेन्नईकडून नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.





