RR vs CSK : नितीश राणाची ऐतिहासिक खेळी! राजस्थानसाठी १८ वर्षांत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

RR vs CSK Nitish Rana becomes 1st player to score fifty in the Powerplay at number 3 for RR : आयपीएल २०२५ चा ११ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८२ धावांचा डोंगर उभारला. हा डोंगर उभारण्यात डावखुरा फलंदाज नितीश राणाने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्याने ३६ चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्याने राजस्थान संघासाठी खास पराक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने केला नव्हता.
नितीश राणाने रचला इतिहास –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नितीश राणाने या सामन्यात पूर्णपणे वेगळ्या शैलीत फलंदाजी केली ज्यामध्ये त्याच्यासमोर सीएसकेचा कोणताही गोलंदाज त्याच्या फटकेबाजीला रोखू शकला नाही. राणाने ३६ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची शानदार खेळी साकारली. त्यामुळे राजस्थानसाठी पॉवरप्लेमध्ये तिसऱ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक करणारा राणा हा पहिला खेळाडू आहे.
Innings Break!
Powered by Nitish Rana's blistering knock, #RR set a target 🎯 of 1️⃣8️⃣3️⃣#CSK aim to chase this successfully for the coveted 2 points
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/fGtgMaWze7
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
नितीश राणाने राजस्थानसाठी केला मोठा पराक्रम –
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नितीश राणा फलंदाजीसाठी आला, तेव्हा राजस्थान रॉयल्स संघाची धावसंख्या १ बाद ४ धावा अशी होती. यानंतर, राणाने संजू सॅमसनसह पहिल्या ६ षटकांत आक्रमक फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या ७९ धावांपर्यंत नेली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. यासह, नितीश राणा आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सचा पहिला खेळाडू बनला, ज्याने तिसऱ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावले. जर आपण आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली, तर नितीश राणा हा असा पराक्रम करणारा ५वा खेळाडू आहे. त्याच्या आधी सुरेश रैना, मोईन अली, अजिंक्य रहाणे आणि वृद्धिमान साहा यांनी ही कामगिरी केली होती.
हेही वाचा – DC vs SRH : केएल राहुलला बोल्ड करणारा, कोण आहे झीशान अन्सारी? जाणून घ्या
आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये तिसऱ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकावणारे खेळाडू :
Watch Nitish Rana's splendid counterattacking 81(36) 👌
Updates ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK | Watch 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
सुरेश रैना – पंजाब किंग्ज विरुद्ध २५ चेंडूत नाबाद ८७ धावा (मुंबई, २०१४)
मोईन अली – राजस्थान रॉयल्स विरुद्ध २१ चेंडूत नाबाद ५८ धावा (ब्रेबॉर्न स्टेडियम, २०२२)
नितीश राणा – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध २२ चेंडूत नाबाद ५९ धावा (गुवाहाटी, २०२५)
अजिंक्य रहाणे – मुंबई इंडियन्स विरुद्ध २० चेंडूत नाबाद ५३ धावा (मुंबई, वर्ष २०२३)
ऋद्धिमान साहा – २३ चेंडूत नाबाद ५२ धावा विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (हैदराबाद, २०१४)
हेही वाचा – DC vs SRH : मिचेल स्टार्कने रचला इतिहास! दिल्ली कॅपिटल्सचा १७ वर्षांचा दुष्काळ संपवला
पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची धावसंख्या १ बाद ७९ होती, जी आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिल्या ६ षटकांत कोणत्याही संघाने केलेली तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीत राजस्थान रॉयल्सच अव्वल स्थानावर आहे, ज्यांनी २०२१ मध्ये अबू धाबी मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिल्या ६ षटकात एक विकेट गमावून ८१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा संघ आहे, ज्यांनी २०२३ मध्ये चेन्नई मैदानावर सीएसके विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावून ८० धावा केल्या होत्या.





