RR vs CSK : धोनीशिवाय चेन्नईची अवस्था बिकट! इतिहासातील ‘ती’ आकडेवारी पाहून चाहते चिंतेत; माही मैदानात नसला की CSK हरतेच?
RR vs CSK : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या गोटात चिंतेचे वातावरण आहे, अशात पहिल्याच सामन्यात धोनीशिवाय सीएसके संघ अडचणीत आला आहे.

RR vs CSK CSK Record Without MS Dhoni IPL : आयपीएल २०२६ च्या तिसऱ्या सामन्यात आज रॉजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आहेत. या सामन्यात धोनीच्या अनुपस्थित प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेच्या फलंदाजांची दाणादाण उडाली आहे. सीएसकेने आता आरआरसमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ज्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता कमी वाटत आहे. मात्र, सर्वात भीतीदायक बाब म्हणजे धोनीशिवाय चेन्नईचा आयपीएलमधील रेकॉर्ड अत्यंत खराब आहे.
२५३ पैकी केवळ ५ सामन्यांत धोनी नव्हता!
४० वर्षीय एमएस धोनीला सराव सत्रादरम्यान पोटरीला दुखापत झाल्याने तो किमान दोन आठवडे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. धोनी सध्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात असून, त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईची अवस्था नेहमीच बिकट राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत २५३ सामने खेळले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी तब्बल २४८ सामन्यांमध्ये धोनी संघाचा अविभाज्य भाग होता. धोनी केवळ ५ सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघात नव्हता. जेव्हा जेव्हा धोनी मैदानात नसतो, तेव्हा चेन्नईला विजय मिळवणे जणू अशक्य होऊन बसते.
धोनीशिवाय चेन्नईची कामगिरी: ५ पैकी ४ पराभव!
Innings Break!
Clinical bowling effort from @rajasthanroyals to restrict #CSK to 127 🎯
Chase on the other side ⏳
Scorecard ▶️ https://t.co/UzbuFk5G26#TATAIPL | #KhelBindaas | #RRvCSK pic.twitter.com/A5Wu2xcR55
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026
आकडेवारीवर नजर टाकली तर, ज्या ५ सामन्यांमध्ये धोनी खेळला नाही, त्यापैकी चेन्नईला केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे, इतर ४ सामन्यांमध्ये त्यांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे.
- एकमेव विजय: २०१० मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध मिळाला होता.
- २०१० चे पराभव: त्याच वर्षी पंजाब आणि आरसीबीविरुद्ध चेन्नईला पराभव पत्करावा लागला.
- २०१९ चा फटका: २०१९ मध्ये धोनी दोन सामन्यांना मुकला होता, तेव्हा सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी चेन्नईला धूळ चारली होती.
धोनी केवळ यष्टीरक्षक किंवा फलंदाज म्हणून नव्हे, तर रणनीतीकार म्हणून चेन्नईसाठी किती महत्त्वाचा आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता २०२६ च्या सुरुवातीच्या दोन आठवड्यांत धोनीची ही उणीव चेन्नई कशी भरून काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





