फक्त 100 ग्राहकांना खरेदी करता येणार Royal Enfield ची ‘ही’ खास बाइक, किंमत 4 लाखांपेक्षा जास्त
Royal Enfield Shotgun 650 Icon Edition | रॉयल एनफिल्डने शॉटगन 650 चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. हे मॉडेल यूएस-आधारित कस्टम मोटरसायकल निर्माता ICON मोटोस्पोर्ट्सच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या स्पेशल एडिशनमध्ये कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. याशिवाय, हटके लूकसह बाइकला सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे Royal Enfield Shotgun 650 Icon Edition च्या केवळ 100 यूनिट्सची जगभरात विक्री होणार आहे.
जगभरातील केवळ 100 ग्राहकांना या लिमिटेड एडिशन शॉटगन 650 ला खरेदी करता येणार आहे. या लिमिटेड एडिशनमध्ये रेस-इंस्पायर्ड ग्राफिक्सची ट्रिपल-टोन पेंट स्कीम पाहायला मिळते. यामध्ये मुख्य गोल्ड कॉन्ट्रॅस्ट कट रिम्स, निळ्या रंगाचे शॉक स्प्रिंग्स आणि इंटीग्रेटेड लोगो असलेली रेड सीट देण्यात आली आहे. याचे बार-एंड मिरर डिझाइन बाइकला अधिक आकर्षक लूक देतात. भारतात Royal Enfield Shotgun 650 Icon Edition ची किंमत 4.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
या बाइकच्या खरेदीवर ग्राहकांना ICON द्वारे डिझाइन करण्यात आलेले खास स्लॅबटाउन इंटरसेप्ट RE जॅकेट देखील देण्यात येणार आहे. लिमिटेड एडिशनची विक्री ग्लोबल ड्रॉपच्या माध्यमातून होणार आहे. भारतीय ग्राहक बाइक खरेदी करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2025 पासून RE अॅपवरून नोंदणी करू शकतात.
याशिवाय, आशिया-पॅसिफिक प्रदेश, युरोप आणि अमेरिका येथील ग्राहक देखील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून बाइकसाठी नोंदणी करू शकतील. याशिवाय, प्रत्येक प्रदेशासाठी फक्त 25 युनिट्सच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
ग्राहक 12 फेब्रुवारीपासून बाइकचे बुकिंग करू शकतात. जे पहिले ग्राहक सर्वातआधी बाइकचे बुकिंग करतील, केवळ त्यांनाच Royal Enfield Shotgun 650 Icon Edition खरेदी करता येणार आहे. या लिमिटेड एडिशनमध्ये 648cc चे पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले असून, जे 46.3 HP आणि 52.3 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.





