पिंपरी | सकल मराठा समाजाकडून आज फेरीचे आयोजन
Updated On:

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज मावळ तालुका यांच्यावतीने बुधवारी (दि.१४) फेरी आयोजन केले आहे. अशी माहिती समन्वयक भाऊसाहेब ढोरे यांनी दिली.
२७ जानेवारी २०२४ रोजी पारित केलेल्या ’सगे सोयरे’ अध्यादेशा’ची येणाऱ्या विशेष अधिवेशनात कायद्यात अंमलबजावणी करण्याचा ठराव मंजूर करावा यासाठी जरांगे पाटील यांनी शनिवारपासून (दि. १०) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवारी (दि. १४ ) सकाळी दहा वाजता फेरीला सुरुवात होईल.
मावळ विभाग : खंडाळा, लोणावळा, वाकसई, कार्ला, शिलाटणे, कामशेत (पवन मावळ, नाणे मावळ) – कान्हे फाटा, (आंदर मावळ) वडगाव मावळ, – छत्रपती संभाजी महाराज चौक, वडगाव फाटा येथे समारोप होईल.




