Cristiano Ronaldo : रोनाल्डोला मिळणार का 99 फटक्यांची शिक्षा?

तेहरान – पोर्तुगीज स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने भविष्यात इराण देशात प्रवेश केल्यास त्याला 99 फटके मारण्याची शिक्षा होऊ शकते. रोनाल्डो अलीकडेच अल नसर फुटबॉल क्लबकडून सामना खेळण्यासाठी इराणला पोहोचला तेव्हा हे वृत्त समोर आले आहे.
इराणच्या भेटीदरम्यान, रोनाल्डोवर पर्शियन कार्पेट्स आणि फुटबॉलपटूच्या पेंटिंगसह चाहत्यांकडून भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला. किमान 85 टक्के अर्धांगवायू असलेली एक चित्रकार फातिमा हमीमी ही तिच्या पायाने पेंटींग्ज करते. तिने चितारलेली पेंटींग्ज रोनाल्डोला भेट देण्यात आली होती.
खरं तर, या अनोख्या भेटवस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोनाल्डोने हमीमीला मिठी मारली आणि तिचे गालावर चुंबन घेतले. इराणच्या कायद्यानुसार, ही कृती गैरवर्तनाचा एक प्रकार मानली जाते. आपली पत्नी नसलेल्या स्त्रीशी असे वर्तन इराणमध्ये गुन्हा आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो 2016 पासून मॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यांना दोन मुले आहेत. रॉड्रिग्ज ही रोनाल्डोच्या इतर तीन मुलांचीही आई आहे.
त्यामुळे रोनाल्डोने केलेल्या या कृतीबद्दल त्याला 99 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता जेव्हा तो इराणमध्ये परत ये ईल, तेव्हा या शिक्षेची अंमलबजावणी होणार का, ही उत्सुकता कायमच राहणार आहे.






