“युरोपच्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज्…”; प्राजक्तासोबत असलेला ‘तो’ तरुण कोण?

Prajakta Mali and Alok Bhadane | अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘चिकी चिकी बूबूम बूम’ हा सिनेमा रिलीज झाला. सध्या प्राजक्ता माळीचे युरोपमधील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने एका तरुणासोबत रोमँटिक फोटोशूट केल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
प्राजक्ता माळीचे हे जुने फोटो असून ते पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागले आहे. युरोपमधील रस्त्यांवरचे हे फोटो तिने २०१९ मध्ये शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शन दिले होते की, “युरोपच्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा? ” शिवाय प्राजक्ताने अलोक भदाणे या तरुणाचे आभार देखील मानले होते. माझा फोटो पार्टनर झाल्याबद्दल आणि युरोप ट्रीपमध्ये माझे चांगले फोटो काढल्याबद्दल धन्यवाद…, असंही यावेळी प्राजक्ताने म्हटलं होतं.
View this post on Instagram
प्राजक्तासोबत असलेला तो तरुण कोण?
प्राजक्ताचे हे फोटो पुन्हा नव्याने व्हायरल होत असल्यामुळे हा मुलगा नेमका कोण आहे? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. प्राजक्तासोबत फोटोशूट करणाऱ्या तरुणाचं नाव अलोक भदाणे असं आहे. दरम्यान, प्राजक्ताने फोटो शेअर केल्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, अलोक भदाणे हा एका ट्रॅव्हलिंग कंपनीचा मालक आहे. देश-विदेशात त्याच्या ट्रॅव्हलिंग कंपन्या काम करतात. Prajakta Mali and Alok Bhadane |
दरम्यान, प्राजक्ताला अनेकदा मुलाखतींमध्ये कसा मुलगा हवा असे विचारण्यात आले आहे. एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने सांगितले होते की, तो चहा पिणारा असेल कारण मला चहा फार छान बनवता येतो आणि प्यायला देखील आवडतो. त्याला दाढी असेल, मराठी माणसाला दाढी मिश्या हव्यात. तो मला डोंगरावर फिरायला घेऊन जाणार असेल आणि माझ्या कविता ऐकणारा असला पाहिजे, असे तिने सांगितले होते.
हेही वाचा:
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर; आता थेट फिल्म इंडस्ट्रीशी संबंध? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण





