Rohit -Virat Future : “विराट-रोहितला पाठिंबा द्या नाहीतर स्पष्ट सांगा”, ‘या’ खेळाडूचा BCCI ला इशारा
गेल्या काही महिन्यांपासून रोहित आणि विराटच्या (Rohit - Virat Future) भविष्याबाबत उलट-सुलट चर्चा रंगत आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा या मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या अफवांना उधाण आले होते.

Rohit – Virat Future : भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज फलंदाज माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Rohit – Virat Future) यांच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या भवितव्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी आक्रमक मागणी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने केली आहे.
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी हे दोघे (Rohit – Virat Future) भारताच्या भविष्यातील योजनांचा भाग आहेत की नाही, याबाबत त्यांना अंधारात न ठेवता समोरासमोर स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली असल्याचे युवराजने ठामपणे मांडले आहे. ( Rohit – Virat Future)
लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ‘जिओस्टार’शी संवाद साधताना युवराजने रोहित आणि विराटच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. रोहित आणि विराट (Rohit – Virat Future) यांच्या निवृत्ती आणि भवितव्याभोवती सध्या निर्माण झालेली अनिश्चितता पाहून त्याला स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांची आठवण झाल्याची खंतही त्याने व्यक्त केली. ( Rohit – Virat Future)
“माझ्या काळात मलाही अंधारात ठेवले गेले” (Rohit – Virat Future)
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटी अनुभवलेल्या कडू आठवणींना उजाळा देताना युवराज म्हणाला, “रोहित आणि विराट आज ज्या स्थितीतून जात आहेत, तशाच टप्प्यातून मीसुद्धा गेलो आहे. त्यामुळे त्यांनी खेळावं की नाही, यावर आपण बाहेर बसून थेट मत देणं योग्य ठरणार नाही. हा पूर्णपणे संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अखत्यारीतला विषय आहे.
परंतु खेळाडूला त्याच्या भवितव्याची नक्की दिशा माहित असणे गरजेचे आहे. माझ्या कारकिर्दीच्या शेवटी मला अशी कोणतीही स्पष्टता दिली गेली नव्हती. संघात माझी नेमकी भूमिका काय आहे, याबद्दल मला कोणीच स्पष्ट सांगितले नाही आणि मला अंधारात ठेवले गेले. इतकी वर्षे देशासाठी योगदान दिलेल्या खेळाडूच्या बाबतीत असा प्रकार घडणे अत्यंत दुर्दैवी होते.”
युवराजने पुढे स्पष्ट केले की, “खेळाडूला भविष्यातील योजनेतून बाद करण्याचा निर्णय घेणे कठीण असू शकते आणि तो निर्णय क्रिकेटप्रेमींना किंवा बाहेरच्या लोकांना आवडणार नाही, हेही खरे आहे. परंतु, निवड समितीने थेट खेळाडूच्या डोळ्यात डोळे घालून सत्य सांगितले, तर त्या खेळाडूला निदान योग्य तो आदर आणि समाधानाची भावना नक्कीच मिळेल.”
“२०२७ विश्वचषकाचा निर्णय स्पष्ट करा” (Rohit – Virat Future)
संघ व्यवस्थापनाला थेट सल्ला देताना युवराज म्हणाला, “जर निवड समितीला रोहित आणि विराट (Rohit – Virat Future) दोघांनी २०२७ चा विश्वचषक खेळावा असे वाटत असेल, तर त्यांनी पुढे येऊन या दोघांच्या खांद्यावर हात ठेवला पाहिजे. ‘आम्हाला तुम्ही २०२७ च्या विश्वचषकात हवे आहात आणि आम्ही प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे उद्या एखादी मालिका खराब गेली तरी संघातील स्थान धोक्यात येईल, असा कोणताही दबाव न घेता नेहमीसारखा तुमचा नैसर्गिक खेळ खेळा,’ असा विश्वास त्यांना देणे आवश्यक आहे.”
रोहितच्या निवृत्तीच्या अफवा अन् बीसीसीआयचे स्पष्टीकरण (Rohit – Virat Future)
गेल्या काही महिन्यांपासून रोहित आणि विराटच्या (Rohit – Virat Future) भविष्याबाबत उलट-सुलट चर्चा रंगत आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा या मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या अफवांना उधाण आले होते. मात्र, लॉर्ड्समधील तिसरा एकदिवसीय सामना हा रोहितचा भारताकडून अखेरचा सामना असेल, अशा सर्व बातम्या फेटाळून लावत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या अफवांचे तात्काळ खंडन केले होते.






