Rohit Sharma : रोहित शर्माचा गगनचुंबी षटकार अन् स्वतःच्या लॅम्बोर्गिनीची फुटली काच, पाहा VIDEO

शिवाजी पार्कवर सरावादरम्यान घडला प्रकार –
शिवाजी पार्क येथे रोहित शर्मा सलग दोन तास फलंदाजीचा सराव करताना दिसला. भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक अभिषेक नायर याच्या मार्गदर्शनाखाली त्याने वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सामना केला. याचवेळी रोहितने पुढे येऊन एक जोरदार षटकार मारला, जो थेट त्याच्या लॅम्बोर्गिनी कारच्या काचेवर जाऊन आदळला. यामुळे कारची काच फुटली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांचीही गर्दी दिसत आहे.
Rohit Sharma hit that six, it went straight and landed on his own Lamborghini.😂🔥 pic.twitter.com/LBINvmeDYc
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 10, 2025
चाहत्यांचा उत्साह आणि रोहितची मेहनत –
रोहित शर्माचा सराव पाहण्यासाठी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात चाहते जमले होते. आयपीएल २०२५ नंतर रोहितने आपल्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष दिले आहे, ज्यामुळे त्याचे वजनही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. भारतीय संघात स्थान टिकवण्यासाठी रोहितला आता प्रत्येक एकदिवसीय मालिकेत आपल्या फलंदाजीने कमाल करावी लागणार आहे. येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एकदिवसीय मालिका त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय, संघातील स्थान पक्के करण्यासाठी त्याला विजय हजारे करंडक स्पर्धेतही खेळावे लागणार आहे.
हेही वाचा – IND vs WI : जैस्वालने जोरदार धडक झाल्यानंतर गिलची घेतली फिरकी, VIDEO होतोय व्हायरल
रोहित शर्मासमोरील आव्हान –
रोहित शर्माला आता प्रत्येक सामन्यात आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मालिका त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते. ‘हिटमॅन’ या नावाला साजेशी कामगिरी करून तो भारतीय संघातील आपले स्थान कायम राखण्यासाठी किती मेहनत घेत आहे, हे त्याच्या सरावातून दिसून येत आहे. चाहत्यांनाही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.





