Ritika Sajdeh : ‘ते धोका नव्हे तर धडधडणारं हृदय…’, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रोहितची पत्नी रितिकाची इन्स्टा स्टोरी व्हायरल

Ritika Sajdeh on stray dogs : सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना पकडून तेथून हटवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला श्वानप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर इंडिया गेट येथे कँडल मार्च काढण्यात आले, तर सोशल मीडियावरही या निर्णयाविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. या विरोधकांमध्ये आता भारताच्या वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनेही सहभाग घेतला आहे.
रितिकाने शेअर केली इन्स्टा स्टोरी –
रितिका सजदेहने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या निर्णयाविरोधात आपले मत व्यक्त केले आहे. तिने शेयर केलेल्या स्टोरीत लिहिले आहे, “ते त्यांना धोका म्हणतात, आम्ही त्यांना धडधडणारे हृदय मानतो. सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यांवरील प्रत्येक भटक्या कुत्र्याला पकडून बंदिस्त करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे त्यांना ना सूर्यप्रकाश मिळेल, ना स्वातंत्र्य, ना ते परिचित चेहरे, ज्यांना ते दररोज सकाळी भेटतात.
Rohit Sharma’s wife Ritika Sajdeh is now crying about stray dogs and has written a nice paragraph for them.
She never spoke about people who died because of rabies. She never spoke about kids who were killed by these stray dogs.
She spoke about Rafah. But she never spoke about… pic.twitter.com/dn6WeJM7ou
— Incognito (@Incognito_qfs) August 12, 2025
तिने पुढे लिहिले, “पण हे फक्त भटके कुत्रे नाहीत. हे ते आहेत, जे चहाच्या टपरीवर बिस्किटांसाठी तुमची वाट पाहतात, दुकानदारांसाठी निःशब्द रक्षक बनतात, आणि शाळेतून परतणाऱ्या मुलांना पाहून शेपटी हलवतात. हे कुत्रे थंड आणि उदासीन शहरात उबदारपणा आणतात. होय, काही समस्या आहेत, जसे की चावणे किंवा सुरक्षेच्या चिंता. पण संपूर्ण प्राणी समुदायाला पिंजऱ्यात बंद करणे हा त्यावर उपाय नाही, तर त्यांचा अंत आहे.”
हेही वाचा – Akash Deep : ‘ते माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त…’, इंग्लंड दौऱ्यानंतर आकाश दीपने केले गंभीरचे कौतुक
रितिकाने सुचवले उपाय –
रितिकाने यावर उपाय सुचवताना म्हणाली, “खरा उपाय काय आहे? मोठ्या प्रमाणावर नसबंदी कार्यक्रम, नियमित लसीकरण मोहीम, कम्युनिटी फीडिंग झोन आणि दत्तक घेण्याच्या मोहिमा. त्यांना शिक्षा देणे किंवा बंदिस्त करणे योग्य नाही. ज्या समाजाला आपले मूक प्राणी वाचवता येत नाहीत, तो आपली माणुसकी गमावत आहे. आज कुत्रे आहेत, उद्या कोण असेल? आपला आवाज उठवा, कारण त्यांच्याकडे आवाज नाही. कृपया ही स्टोरी शेयर करा.” हा निर्णय आणि त्याविरोधातील वाद येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.





