Rohit Sharma And Virat Kohli : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंतसारखे स्टार खेळाडू संघात परतले आहेत. कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. कोणत्याही खेळाडूला उपकर्णधार करण्यात आलेले नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना हरलेला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाला 19 सप्टेंबरला होणारा कसोटी सामना जिंकून हा विक्रम कायम ठेवायचा आहे. भारतीय फलंदाजीचे सूत्रधार आहेत रोहित आणि विराट… रोहित शर्मा आणि विराट कोहली ही भारतीय क्रिकेट संघाची अशी दोन नावे आहेत, ज्यांनी मिळून इतक्या धावा केल्या आहेत जे इतर खेळाडूंसाठी एक स्वप्न आहे. गेल्या काही काळापासून रोहितने आपला खेळ पूर्णपणे बदलला आहे. तो क्रीझवर येताच झटपट धावा काढतो आणि विरोधी संघांना दडपणाखाली आणतो. दुसरीकडे, विराट कोहली कोणत्याही परिस्थितीत आणि खेळपट्टीवर धावा करण्यात पटाईत आहे. त्याने आपले कर्तृत्व जगभर सिद्ध केले आहे. पहिल्या कसोटीत या दोन खेळाडूंच्या बॅटने चांगली कामगिरी केली तर बांगलादेशचे गोलंदाज अडचणीत येतील. कोहलीने बांगलादेशविरुद्ध झळकावले आहे द्विशतक… सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले असून 437 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. या कालावधीत त्याची सरासरी 54.62 राहिली आहे. 2017 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध 204 धावांची खेळी करत द्विशतक झळकावले होते. साल 2022 मध्ये कोहलीने या संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. बांगलादेशी संघाविरुद्ध क्षेत्ररक्षणात आश्चर्यकारक कामगिरी करताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 7 झेलही घेतले आहेत. World Cup 2023 : वनडे विश्वचषकामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हातभार, तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा झाला नफा… रोहितची कामगिरी असमाधानकारक… क्रिकेट जगतात भरपूर धावा करणाऱ्या रोहित शर्माची कामगिरी बांगलादेशविरुद्ध काही खास राहिलेली नाही, ज्यामध्ये त्याने 3 कसोटी सामन्यात एकूण 33 धावा केल्या, त्यादरम्यान 21 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. रोहितने 2019 मध्ये शेजारील देशाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. बांगलादेशविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कर्णधार रोहितपेक्षा खूप पुढे आहे. त्याने रोहितपेक्षा 404 धावा जास्त केल्या आहेत. पण बघण्यासारखी गोष्ट म्हणजे कोहलीने रोहितपेक्षा दुप्पट सामने खेळले आहेत.