मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल 2025 मध्ये आपल्या लयीत दिसत नाही. या हंगामात त्याने 7 सामन्यांत 26.33 च्या सरासरीने केवळ 158 धावा केल्या आहेत. तरीही, मोठ्या संघाविरुद्ध रोहित धावा करण्याची संधी सोडत नाही. नुकत्याच चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 76 धावांची खेळी करत इतिहास रचला. यासह तो आयपीएलमध्ये एका मैदानावर एखाद्या विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या यादीत विराट कोहली, एमएस धोनी आणि ख्रिस गेल यांसारखे दिग्गज त्याच्या मागे आहेत. रोहितची बॅट चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध, विशेषतः वानखेडे स्टेडियमवर, नेहमीच तळपते. आयपीएलच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वानखेडेवर भिडले, तेव्हा रोहितने धावांचा पाऊस पाडला. नुकत्याच झालेल्या सामन्यात 76 धावांची खेळी करत रोहितने आपल्या घरच्या मैदानावर CSK विरोधात 500 धावांचा टप्पा पार केला. करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. हे पण वाचा : Bhuvneshwar Kumar : सामन्यानंतर खेळाडू आपापसात काय बोलतात? भुवनेश्वर कुमारने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज (Rohit Sharma) ठरला. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अरुण जेटली स्टेडियमवर 483 धावा केल्या आहेत. 27 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. त्यामुळे आता विराट कोहली रोहितच्या या क्लबमध्ये सामील होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकाच मैदानावर विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक आयपीएल धावा 522 – रोहित शर्मा v CSK, वानखेडे स्टेडियम 483 – विराट कोहली v DC, अरुण जेटली स्टेडियम 449 – ख्रिस गेल v PBKS, चिन्नास्वामी स्टेडियम 442 – विराट कोहली v PBKS, चिन्नास्वामी स्टेडियम 438 – एमएस धोनी v RCB, चिन्नास्वामी स्टेडियम 437 – विराट कोहली v KKR, चिन्नास्वामी स्टेडियम 431 – रोहित शर्मा v KKR, ईडन गार्डन्स