IPL Records : आयपीएलचे 10 विजेतेपद पटकावणाऱ्या कर्णधारांचे संपले युग; एकाला हटवलं तर दुसऱ्यानं घेतला धक्कादायक निर्णय…

Indian Premier League Records : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पहायला मिळाले. या मोसमात स्पर्धेत सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे दोन कर्णधार खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत. वास्तविक, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी हे आयपीएलचे सर्वात यशस्वी कर्णधार राहिले आहेत. दोन्ही कर्णधारांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र यावेळी दोघेही कर्णधार नव्हे तर खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत.
रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले, तर धोनीने ( MS Dhoni ) चेन्नईला ( Chennai Super Kings) त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले. पण आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी रोहित शर्माला ( Mumbai Indians ) कर्णधारपदावरून हटवण्यात आले, त्यामुळे एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी…
आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. या संघाने पहिल्यांदा हार्दिक पांड्याला (जो गेल्या मोसमापर्यंत गुजरात टायटन्सचा कर्णधार होता) रोख व्यवहारात खरेदी केलं. मात्र, तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण, या व्यवहारांनंतर काही दिवसांनी, मुंबईने जाहीर केले की आगामी हंगामात हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळेल. रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधारपदी रिप्लेस केलं. मात्र, रोहित शर्माऐवजी हार्दिकला मुंबईचा कर्णधार का करण्यात आले हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान या निर्णयानंतर चाहते चांगलेच संतापले होते. मुंबईच्या संघाला चाहत्यांनी जोरदार ट्रोल देखील केले होते. तसेच मुंबईच्या इन्स्टाग्रामवर जवळपास लाखो फॉलोअर्स कमी झाल्याचे पहायला मिळाले. अनेक वाद-विवाद देखील झाल्याचे दिसून आले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/csk-vs-rcb-kohli-close-to-historical-record-only-6-runs-needed-against-chennai/
धोनीने घेतला धक्कादायक निर्णय…
मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला आपल्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून देणाऱ्या एमएस धोनीने आयपीएल 2024 सुरू होण्याच्या एक दिवस आधी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीच्या जागी सलामीवीर फलंदाज रुतुराज गायकवाडकडे चेन्नईची कमान सोपवण्यात आली होती.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/dhoni-will-create-history-against-rcb-will-become-the-second-csk-player-to-do-so/
धोनीच्या या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, धोनीने गेल्या वर्षीच गायकवाडला कर्णधार बनवण्याचे संकेत दिल्याचे वृत्त समोर आले आहे. धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, असे अनेक जण मानत आहेत. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





