#IPL Tournament : रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; धोनीलाही टाकले मागे…

मुंबई :- मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहितला गौरवण्यात आले आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे.
15 वर्षांपूर्वी याच दिवशी आयपीएल स्पर्धेचा पहिला लिलाव झाला होता. याला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्टार स्पोर्टसने इनक्रेडिबल अवॉर्डस जाहीर केले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड एकूण 6 विभागांमध्ये करण्यात आली आहे.
पुरस्कार –
– सर्वोत्कृष्ट कर्णधार – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद)
– धोनी, शेन वॉर्न व गौतम गंभीर यांना टाकले मागे.
– सर्वोत्कृष्ट फलंदाज – एबी डिव्हीलीयर्स
– डिव्हिलियर्सची सुरेश रैना, ख्रिस गेल व डेव्हिड वॉर्नरवर मात
– सर्वोत्कृष्ट गोलंदाज – जसप्रीत बुमराह
– बुमराहने सुनील नरेन, राशिद खान व यजुवेंद्र चहलला टाकले मागे
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/an-india-pakistan-match-must-happen-otherwise-accs-media-deal-will-be-in-jeopardy/
– सर्वोत्कृष्ट प्रभावशाली खेळाडू – आंद्रे रसेल
– शेन वॉटसन, राशिद खान व सुनील नरेनवर मात
– एका मोसमातील सर्वोत्तम फलंदाज – विराट कोहली
– विराटच्या आयपीएल 2016 साली 973 धावा
– मोसमातील सर्वोत्तम गोलंदाज – सुनील नरेन
– आयपीएल 2022 साली 24 बळी





