Rohit Sharma Angry : “नंतर, नंतर, थांबा रे बाबा!” चाहत्यांवर भडकला रोहित शर्मा; हॉटेलबाहेर हिटमॅनची सटकली अन् कारवर आपटला हात
Rohit Sharma Angry : हिटमॅन' रोहित शर्मा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Rohit Sharma Angry Video Viral : नेहमीच शांत आणि हसमुख स्वभावासाठी ओळखला जाणारा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी सज्ज असलेला रोहित सध्या त्याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या ‘रागा’मुळे अधिक व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मैदानावर शांत राहून प्रतिस्पर्ध्यांची धुलाई करणाऱ्या रोहितचा संयम हॉटेलबाहेर सुटलेला पाहायला मिळाला. शुक्रवारी जेव्हा रोहित मुंबई इंडियन्सच्या टीम हॉटेलवर पोहोचला, तेव्हा त्याचा मूड काहीसा खराब असल्याचं जाणवलं.
नेमकं काय घडलं?
कॅज्युअल कपड्यांमध्ये हॉटेलवर पोहोचलेला रोहित काहीसा चिडलेला दिसत होता. गाडीतून उतरल्यानंतर जेव्हा त्याच्या गाडीची डिक्की उघडण्यास विलंब झाला, तेव्हा रोहितचा राग अनावर झाला. पॅपराझी आणि कॅमेऱ्यांसमोरच त्याने गाडीवर जोरात हात पटकला. रोहितचा हा आक्रमक अवतार पाहून तिथे उपस्थित असलेले कॅमेरामन आणि चाहतेही काही काळ थक्क झाले. सहसा पत्रकारांशी मस्करी करणारा रोहित यावेळी पूर्णपणे वेगळ्याच मूडमध्ये होता.
Rohit Sharma wasn’t in a good mood, he tried opening the car trunk but it didn’t open. Frustrated, he hit the car and said,
“Aree Khula nhi, Khol yrr.. Kya kar Rahe Ho” 🫣🔥The angry mood of bRO🥵 pic.twitter.com/QVWAzmK9TN
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 27, 2026
मराठीत झापलं, चाहत्यांना दिला नकार –
रोहितला पाहून तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी फोटो आणि ऑटोग्राफसाठी विनंती केली. मात्र, संतापलेल्या रोहितने त्यांना स्पष्टपणे नकार दिला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये रोहित वैतागून मराठीत म्हणताना ऐकू येत आहे की, “नंतर, नंतर, थांबा रे बाबा!”
एकीकडे रोहितचा फिटनेस आणि सराव सत्रातील त्याची फटकेबाजी चाहत्यांना आनंद देत आहे, तर दुसरीकडे त्याच्या या रागाच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. आयपीएलच्या दबावामुळे रोहित असा वागला की आणखी काही खासगी कारण होतं, असा प्रश्न आता त्याचे चाहते विचारत आहेत.





