Rohit Pawar Press : ‘जळालेला स्वेटर, पायात चप्पल आणि बंद घड्याळ…’, अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी प्रेझेंटेशनद्वारे पुराव्यांसह मांडल्या शंका

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी १० फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.

Updated On:

Rohit Pawar Press : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना उमटत असून अनेकांच्या मनात अजूनही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. काही कार्यकर्ते आणि नेत्यांकडून या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी भावनिक पण स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.

रोहित पवार म्हणाले, “९ तारखेला मी अजितदादांच्या अपघाताबाबत काही बोलणार होतो. त्यानंतर १० तारखेला यावर मला काय वाटतं ते सांगणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, काही लोकांनी भावनिक अवस्थेत काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले.”

“काहींना वाटत होतं की दादा परत येतील, विमानात सहा जण होते, सहावी व्यक्ती दादा नव्हते, ती बॉडी दादांची नाही… दादा आज येतील, उद्या येतील. दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारेन, अशी भावना होती. मलाही काही काळ असंच वाटत होतं की हा सगळा एखादं स्वप्न आहे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते भावूक झाले. “पण जेव्हा दादांचा जळालेला स्वेटर, पायातली चप्पल आणि हातातलं बंद घड्याळ पाहिलं, तेव्हा वास्तव समोर आलं. दादा नेहमी घड्याळ १५ मिनिटे पुढे ठेवायचे. ते घड्याळ बंद अवस्थेत पाहून जे कोणी तिथे होते, ते सगळे निशब्द झाले,” असे त्यांनी सांगितले.

“काही लोकांना अजूनही वाटतं की ही घटना घडलीच नाही. पण ही घटना घडली आहे. आज दादा आपल्यात नाहीत, हे सत्य आहे. मात्र विचारांच्या रूपाने ते कायम आपल्या सोबत राहतील,” असे भावनिक उद्गार रोहित पवार यांनी काढले.

अजितदादांच्या प्रेमापोटी मी माहिती काढली : रोहित पवार

पुढे बोलताना म्हणाले, सर्व माहिती घेऊन मी तुम्हाला काही माहिती सांगतो. काही लोक म्हणतील ही माहिती कुठून आणली, कशी आणली. अजितदादांच्या प्रेमापोटी आम्ही ही माहिती गोळा केली आहे. आम्ही सरकारमध्ये नाही. तरीही जे जमलं ते केलं. दादा आणि साहेबांनी एकच सांगितलं प्रयत्न करत राहा. त्यामुळेच हा प्रयत्न केला आहे. लोकांना काय घडलं ते कळलं पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Baramati Farmer Protest: "आता आश्वासन नको, पाणी द्या!" जनाई-शिरसाईच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; उपोषणाचा इशारा

2026-10-02 03:30:34

Baramati Farmer Protest: "आता आश्वासन नको, पाणी द्या!" जनाई-शिरसाईच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; उपोषणाचा इशारा

Baramati News: बारामतीत शाळांच्या गणवेश खरेदीवरून वाद पेटला! घोटाळा झाल्याचा आरती शेंडगे यांचा आरोप...वाचा सविस्तर

2026-09-29 04:00:52

Baramati News: बारामतीत शाळांच्या गणवेश खरेदीवरून वाद पेटला! घोटाळा झाल्याचा आरती शेंडगे यांचा आरोप...वाचा सविस्तर

Narendra Modi Baramati Visit: "मिशन बारामती"नंतर मोठं राजकीय वळण! नरेंद्र मोदी पुन्हा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात...नेमकं कारण काय?

2026-09-29 03:45:15

Narendra Modi Baramati Visit: "मिशन बारामती"नंतर मोठं राजकीय वळण! नरेंद्र मोदी पुन्हा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात...नेमकं कारण काय?

Baramati News: बारामतीचा जिरायती पट्टा अजूनही तहानलेलाच! तलाव-तळे कोरडे , पिके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल

2026-09-29 03:15:31

Baramati News: बारामतीचा जिरायती पट्टा अजूनही तहानलेलाच! तलाव-तळे कोरडे , पिके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल

Baramati News : युगेंद्र पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांची विचारपूस

2026-09-17 07:30:13

Baramati News : युगेंद्र पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांची विचारपूस