महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उतरणार रोहित पाटील? ; समजून घ्या संपूर्ण राजकीय समीकरण

Rohit Patil । महाराष्ट्रात काही महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आज पंचवीस वर्षांचे होत आहेत. त्यामुळे वयाची 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर रोहित पाटील यांचा आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे रोहित पाटल यांनी यंदा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी विनंतीही कार्यकर्त्यांकडून करण्यात येतीय.
रोहित पाटील विधानसभा निवडणूक लढवणार? Rohit Patil ।
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रोहित पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मी आता विधानसभा निवडणूक का लढवू नये? असा प्रतिसवाल केला. तसेच पुढे रोहित पाटील म्हणाले की, “याबाबत काहीही बोलणे मलाआवश्यक वाटत नाही. ” असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी ,”आता विधानसभेच्या बाबतीत या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व आदरणीय पवार साहेब, पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते एकत्र येऊन निर्णय घेतील.” असेही सांगितले.
त्यांच्या बोलण्याने आता रोहित पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाले आहेत. शरद पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवता आला, असेही रोहित पाटील म्हणाले. आगामी काळातही आपण अशाच विधानसभेला सामोरे जाणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आलेच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष राहावा, हेच आमचे ध्येय असल्याचेही रोहित पाटील म्हणाले.
रोहित पाटील म्हणाले, “मी अनेक दिवसांपासून विधानसभा मतदारसंघात काम करत आहे. प्रवास, लोकांचे प्रश्न समजून घेणे. आबांना अजून काही काम करायचे होते, पण त्यांच्या निधनामुळे काही काम होऊ शकले नाही. ती कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. अनेक कामेही पूर्ण झाली आहेत. रोहित पाटील म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा कामातून पूर्ण झाल्या पाहिजेत, असा आमचा विश्वास आहे.” असणेही त्यांनी यावेळी सांगितले.
“1997 मध्ये आबांनी एमआयडीसी मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी विरोधकांनी गैरसमजातून प्रकल्प बंद पाडल्याचे” रोहित पाटील यांनी सांगितले. रोहित पाटील म्हणाले की, “तासगाव कवठेमहांकाळसाठी एमआयडीसीला सहा महिन्यांपूर्वी मान्यता देण्यात आली होती. पाटील म्हणाले की, मी अनेक कंपन्यांशी चर्चा करत आहे.
कोण आहे रोहित पाटील? Rohit Patil ।
रोहित पाटील आर.आर पाटील यांचे चिरंजीव आहेत. 1998 मध्ये जन्मलेल्या रोहितने राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक आणि सोशल मीडिया प्रभावक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे वडील आर.आर. पाटील हे 1991 ते 2015 पर्यंत तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. रोहितच्या निवडणूक भाषणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) विजयी झाला आणि सर्वाधिक जागा जिंकल्या.





