Rohini Khadse | पुणे पोलिसांकडून खराडीमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीदरम्यान कारवाई करण्यात आली. यात २ महिला आणि ५ पुरुषांना अटक करण्यात आली आहे. यात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आहे. पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसे आज सकाळी ११ वाजता थेट पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार होत्या. यावेळी रोहित पवार देखील उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांची पोलिस आयुक्तांसोबतची ही भेट अचानक रद्द झाली आहे. या भेटीपूर्वी पुणे पोलिस आयुक्तालयात माध्यमांना प्रवेश नसल्याचे सांगण्यात आले होते. माध्यमांना आयुक्तालयात जाण्यासाठी मज्जाव घालण्यात आल्यानंतर काही वेळातच ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली. समोर आलेलया माहितीनुसार, रोहिणी खडसे या सध्या पुण्यातच आहेत पण त्या पोलिस आयुक्त कार्यालयाकडे येणार नाहीत. रोहिणी खडसे रेव्ह पार्टी प्रकरणाबद्दलची माहिती घेणार होत्या. मात्र, ही भेट रद्द झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच रोहिणी खडसे यांची पोलिस आयुक्तांसोबतची भेट रद्द होण्याचे कारण हे अद्याप समजू शकलेले नाही. Rohini Khadse | रोहिणी खडसे यांची पोस्ट दरम्यान, पतीच्या अटकेच्या २४ तासांनंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर आहे आणि योग्य वेळी सत्य बाहेर येईल.” त्यांनी या प्रकरणी थेट आरोपांवर भाष्य टाळले आहे. Rohini Khadse | हेही वाचा : थायलंड-कंबोडियामधील संघर्ष संपण्याची चिन्हे ; मलेशियात दोन्ही देशांचे नेते करणार चर्चा