Neha Kakkar – Rohanprit Singh | गायिका नेहा कक्कर तिच्या गाण्यांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आहे. तरुण वर्गात तिच्या गाण्यांची खूप क्रेझ आहे. परंतु सध्या नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा 2020 मध्ये विवाह झाला. नुकतीच यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतर तिच्या घटस्फोटच्या चर्चा सुरू झाल्या आहे. गेल्या काही काळापासून या जोडप्यामध्ये काही चांगले चालत नसल्याची अफवा सुरू आहे. आता या अफवांवर रोहनप्रीत सिंगने मौन सोडले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. रोहनप्रीतने म्हटलं की, “अफवा फक्त अफवा आहेत, त्या खऱ्या नाहीत, त्या बनवलेल्या गोष्टी आहेत. उद्या कोणी काही बोलेल, परवा कोणी काही बोलेल, पण त्याचा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर परिणाम होऊ देणार नाही.” Neha Kakkar | रोहनप्रीतने पुढे म्हटलं की, “मला वाटतं की अशा गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्याव्यात. हे लोकांचं काम आहे, त्यांना ते करण्यात मज्जा येते. आपण जे काही जीवन जगत आहोत ते आपण आपल्या मनाप्रमाणे जगतो.” दरम्यान, मागील काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंह यांच्यात वाद सुरु आहे. यामुळे हे जोडपे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र रोहनप्रीतने यावर भाष्य करत चर्चांना पूर्णविराम दिला. Neha Kakkar |