लॉस एंजेलिस : हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे रविवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. रेडफोर्ड यांचे मंगळवारी सकाळी उटाह येथील त्यांच्या घरी झोपेत निधन झाले, असे निकटवर्तीयांनी सांगितले. बुच कॅसिडी अँड द सनडान्स किड, द स्टिंग, ऑल द प्रेसिडेंट्स मेन आणि ऑर्डिनरी पीपल सारख्या चित्रपटांतील रेडफोर्ड यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. रॉबर्ट रुडफोर्ड यांचा शेवटचा चित्रपट अॅव्हेंजर्स: एंडगेम होता. त्यामध्ये त्यांनी सेक्रेटरी अलेक्झांडर पियर्सची भूमिका पुन्हा साकारली होती. रेडफोर्डने यांनी अ वॉक इन द वुड्स मध्ये मुख्य भूमिका केली होती. हा एक तुफान हिट चित्रपट ठरला होता. तर २०१८ चा द ओल्ड मॅन अँड द गनला निरीक्षकांनी गौरवले होते. त्यांनी अनेक टेलिव्हिजन प्रकल्पांवर कार्यकारी निर्माता म्हणूनही काम केले. अलिकडेच एएमसी थ्रिलर डार्क विंड्सचीही त्यांनी निर्मिती केली होती. १९८० मध्ये ऑर्डिनरी पीपल या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना ऑस्कर मिळाला आणि २००२ मध्ये त्यांना मानद जीवनगौरव ऑस्कर मिळाला. रेडफोर्ड हे एक समर्पित पर्यावरणवादी देखील होते, १९६१ मध्ये त्यांनी युटा येथे स्थलांतर केले. परदेशात आणि अमेरिच्या पश्चिमेकडील भागात नैसर्गिक लँडस्केपसौंदर्यस्थळांचे जतन करण्यासाठी प्रयत्नांचे नेतृत्व केले होते.