Pope Leo XIV : रॉबर्ट प्रीव्होस्ट यांची पोप म्हणून निवड; 18 मे रोजी स्वीकारणार पोप पदाची सूत्रे

व्हॅटिकन सिटी : उत्तर अमेरिकेतील रॉबर्ट प्रीव्होस्ट यांची कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी आता पोप लिओ १४ वे असे नवीन नाव धारण केले आहे. दिनांक १८ मे रोजी ते पोप पदाची सूज्ञे अधिकृतपणे स्वीकारणार आहेत, असे व्हॅटिकनच्यावतीने सांगण्यात आले. त्यानंतर २१ मे रोजी ते जगभरातील ख्रिश्चनांना नवीन पोप या नात्याने पहिल्यांदाच मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवारी चर्चचे नवीन पोप या नात्याने त्यांनी पहिल्यांदाच सामुदायिक प्रार्थना घेतली. चॅपेलमध्ये कार्डिनलच्या परिषदेमध्ये झालेल्या निवड प्रक्रियेत रॉबर्ट प्रीव्होस्ट यांची कॅथोलिक चर्चचे २६७ वे पोप म्हणून गुरुवारी दुपारी निवड झाली आणि या निवडीची घोषणा काल रात्री उशिरा अधिकृतपणे करण्यात आली. आपल्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याची कबूली नूतन पोपनी आपल्या पहिल्याच भाषणात दिली.
रॉबर्ट प्रीव्हस्ट हे मूळचे उत्तर अमेरिकेतील शिकागो येथील असून लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप होते. त्यांच्यापश्चात प्रीव्होस्ट हे पोप व्हावेत, अशी पोप फ्रान्सिस यांचीच इच्छा होती. फ्रान्सिस यांनीच प्रीव्होस्ट यांना व्हॅटिकनच्या बिशपसाठीच्या शब्दकोश विभागाचे प्रमुख म्हणून २०२३ मध्ये व्हॅटिकनला पाठवले होते. चर्चच्या कामकाजामध्ये हे काम महत्वाचे मानले जाते. त्यापुर्वी प्रीव्होस्ट अनेक वर्षे पेरूमध्ये धर्मोपदेशकाचे काम केले होते. २०२३ मध्ये तत्कालिन कार्डिनल असलेल्या प्रीव्होस्ट यांनी महिलांना चर्चच्या कामात महत्वाचे स्थान मिळायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
प्रीव्होस्ट यांनी लिओ १४ वे नाव धारण केले आहे. त्यांच्यापुर्वी १८७८ ते १९०३ दरम्यान पोप राहिलेल्या इटलीच्या धर्मगुरुंनी देखील लिओ ८ वे हे नाव धारण केले होते. लिओ या राजाच्या सामाजिक न्याय आणि सुधारणांच्या वारस्याला पुढे सुरू ठेवण्यासाठीच आपण लिओ नाव घेतल्याचे त्यांनी सांगितले. पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे व्हॅटिकनमधील सर्व पदाधिकारी आपोआप कार्यमुक्त झाले होते. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होईपर्यंत आपल्या पुर्वीच्या पदांवर आपले काम पुर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यात यावे, अशी सूचना नवीन पोपनी केली आहे.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांना भारतीय जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत. पोप यांच्या कॅथोलिक चर्चच्या नेतृत्वाची मोदी यांनी प्रशंसा केली आहे. शांतता, सौहार्द, एकात्मता आणि सेवेचा आदर्श पुढे नेण्यासाठी महत्वाच्या असलेल्या टप्प्यावर ते कॅथलिक चर्चचे नेतृत्व करत आहेत. आमची सामायिक मूल्ये पुढे नेण्यासाठी पवित्र पोप यांच्याशी सातत्त्याने संवाद आणि संबंध ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे आपल्या अभिनंदनाच्या संदेशात म्हटले आहे.



