पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप; वाहतूक विभागाकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Pune News | पुणे शहरात रात्रीपासून जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनांची गती मंदावली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतुकीची सद्यस्थिती लक्षात घेता पुणे शहर वाहतूक विभाग यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे
- आपल्या प्रवासापूर्वी संबंधित मार्गावरील वाहतुकीची स्थिती तपासा.
- शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करा.
- जर तातडीची गरज नसेल तर प्रवास टाळावा किंवा दुपारी १२ ते सायं. ५ या वेळीच प्रवास करावा.
- संध्याकाळी ५ ते ८ या गर्दीच्या वेळेत प्रवास टाळावा.
नागरिकांचा आरोप आहे की, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असतानाही पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी झोपेत असल्यासारखे वागत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढली आहे. Pune News |
दुसरीकडे, कॉमरझोन जेल रोड, येरवडा गुंजन चौकात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा:
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराची चांगली सुरुवात ; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ





