पुणे जिल्हा | बारामतीत चालकांना रस्ता सुरक्षेचे धडे

जळोची, (वार्ताहर)- वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती, भारतकेअर्स संस्था आणि मर्सिडिज यांच्यावतीने पावले उचलली जात असून त्यासाठी टॅब प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे चालकांना वाहतूक नियमांचे व सुरक्षित प्रवासाचे धडे दिले जात आहेत.
वाहन अपघातांचे वाढलेले प्रमाण रोखणे किंवा कमी करण्यासाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय देखील विविध उपाययोजना राबवित आहे.
बारामती विभागात दुचाकी, तीनचाकी,चारचाकी व इतर वाहनांची लाखोंच्या संख्येत नोंद आहे. या वाहनधारकांमध्ये आणि नवीन वाहन घेणाऱ्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी ‘ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती’ ने पावली उचलली आहेत.
त्यानुसार रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत विविध जनजागृती, उपक्रम आदी योजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामतीच्या वतीने वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यासाठी टॅब प्रयोगशाळे मार्फत चालकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर म्हणाले की, सद्यस्थितीत वाहनचालकांना या चाचणीच्या माध्यमातून वाहतूकचे नियम आणि जबाबदाऱ्या सोप्या पध्दतीने सांगितल्या आहेत. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांना रस्ते अपघात कसे टाळले पाहिजेत हे समजून सांगितले जात आहे.
हा उपक्रम मोफत असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा नियमांचे उल्लंघन व पालन केल्यास काय होते व इतर अनेक विषयांवर माहीती दिली जाते . प्रश्न सोडवून घेऊन प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
विशेष माहितीपटातून प्रबोधन
टॅब प्रयोगशाळेची पाश्र्वभूमी आणि कामकाज आरटीओ कार्यालयामध्ये होत आहे. श्री महाकाल एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारातून आणि मर्सिडिज यांच्या सहयोगातून मोफत राबविला जात आहे.
ड्रायव्हर्स सेन्स टॅब लॅब सुरु असून नवीन शिकाऊ परवानाधारकांसाठी उपयुक्त वाहन परवाना संबंधित कागदपत्र पडताळून चाचणी आठ ते दहा मिनिटांचा विशेष माहितीपट दाखवून वाहतूक नियमांचे उल्लंघन व पालन केल्यास काय होते
याबद्दल माहितीपटात जनजागृती केली जात आहे. प्रात्यक्षिकाद्वारे वाहतूक नियमांवर आधारित प्रश्नावलीनंतर संबंधित चालकाला चाचणी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे.




