Road Safety World Series | सिक्सर किंग युवराजचा धडाका
Updated On:

मुंबई – भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व सिक्सर किंग युवराज सिंगने आपण अद्यापही आक्रमक क्रिकेट खेळू शकतो हे दाखवून दिले आहे. रोड सेफ्टी क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने वादळी फलंदाजी केली.
एकाच षटचकात चार षटकारांची बरसात करत आक्रमक फलंदाजी करताना युवराजने दमदार अर्धशतकी खेळी केली. युवराजने या सामन्यात 22 चेंडूंमध्ये सहा षटकार व दोन चौकारांसह नाबाद 52 धावांची खेळी केली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व युवराज या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने यावेळी 20 षटकांमध्ये फक्त तीन फलंदाज गमावत 204 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला केवळ 7 बाद 148 धावाच करता आल्या. भारताने हा सामना 56 धावांनी जिंकला.





