आर एम धारीवाल फाऊंडेशनचा दिव्यांग युवकाला मदतीचा हात

आर एम धारीवाल फाऊंडेशनने एका युवकाला ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक व्हील चेअर कम सायकल भेट देत मोठी मदत केली आहे. 35 वर्षीय दत्तात्रय अशोक विभुते यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे त्यांना अपंगत्वत आले. त्यांच्या मदतीसाठी आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई धारीवाल या पुढे सरसावल्या.
त्याचे झाले असे की, दत्तात्रय अशोक विभुते हे कामावरून दुचाकीने घरी जात असताना मुसळधार पाऊस सुरू असल्याने अचानक जोराचा वारा सुरु झाला. वारा आणि पाऊस यांचा मारा वाचविण्यासाठी दत्तात्रय यांनी जवळच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र जोराच्या वाऱ्याने तेच झाड त्यांच्या अंगावर पडले आणि झाडाच्या बुंध्यात अडकून पडले. काहीवेळाने जेसीबीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र या अपघातात ते गंभीर जखमी झाले. परंतु डोक्यात हेल्मेट असल्याने नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले.
मात्र त्यांच्या कंबरेखालील भाग अपघातग्रस्त झाल्याने अपंगत्वत आले. त्यांना चालता फिरता येईना हि बाब त्यांच्या नातेवाईकांनी शोभाताई धारीवाल यांना कळविली. शोभाताईंनी परिस्थिती लक्षात घेता चेन्नई येथील ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक व्हील चेअर कम सायकल कंपनीशी बोलून त्वरित मागणी करून दिवाळीची भेट दत्तात्रयाला दिली. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक व्हील चेअर कम सायकल कशी चालवायची याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीने प्रशिक्षण दिले. आता दत्तात्रय स्वतःची सर्व काम स्वतः करू शकतात. यासाठी त्यांनी आर एम डी फाऊंडेशनच्या शोभा धारीवाल यांचे आभार मानले आहेत.





