मुंबईतल्या खड्ड्यांवर आरजे मल्लिष्काच नव गाणं, व्हिडिओ व्हायरल

मुंबई – खड्ड्यांच साम्राज्य पसरलेल्या मुंबईची आरजे मल्लिष्काने खड्डयांसोबत एक गाणं चित्रीत करून मुंबई महापालिकेवर टीका केली आहे.‘चांद जमिन पर आया’ असं या गाण्याच शीर्षक आहे गेल्यावर्षी तिने ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का?’ आणि झिंगाटच्या धर्तीवर ‘मुंबई गेली खड्ड्यात’ असे गाणे तयार करून पालिकेवर टीका केली होती. आता परत एकदा आपल्या एका नव्या गाण्यासह ती चर्चेत आली आहे. तिने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर तिने ‘चांद जमिन पर’ हे गाणं तयार केल आहे. मुंबईतील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच आता आरजे मलिष्कानेही हा व्हिडीओ शेअर करत ही समस्या मांडली आहे. मलिष्काने आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरू ‘चांद जमीन पर’ या नावाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांसोबत तिने हे गाणं चित्रीत केले आहे. करवा चौथचा व्रत सोडताना चाळणीतून चंद्राला पाहून उपवास सोडतात, अगदी त्याचप्रकारे मलिष्का चाळणीतून खड्ड्यांना पाहताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर कधी खड्ड्यात कोणी पडल्यावर ‘तुम आए तो आया मुझे याद, गली मै आज चांद निकला’ असे म्हणताना दिसत आहे. तर कधी त्या खड्ड्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.

यापूर्वीही मलिष्काने उपहासात्मक गाण्यातून मुंबई महानगरपालिकेवर टीका केली होती. तिच्या या नव्या गाण्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)