Riyan Parag : जो मैं बोलता हूँ, वो करता हूँ…!’, दोन वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी परागने करुन दाखवली खरी

Riyan Parag fulfills his dream by hitting six consecutive sixes in IPL 2025 : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. सामन्यातील प्रत्येक चेंडूवर खेळ बदलतो. म्हणूनच खेळाडू शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी लढतात. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या रियान परागसोबतही असेच काहीसे दिसून आले आहे. खरंतर, १४ मार्च २०२३ रोजी रियान परागने त्याच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये रियान परागने जे लिहिले होते, ते आज खरे करुन दाखवले.
रियान परागने करुन दाखवले –
दोन वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये रियान म्हणाला होता की, ‘मला आतून असे वाटते की एक दिवस मी आयपीएलमध्ये एका षटकात ४ षटकार मारेन.’ मात्र, ज्यावेळी त्याने ही पोस्ट केली होती, त्यावेळी लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती. आता तेच लोक रियान परागला आणि त्याच्या कामगिरीला सलाम करत आहेत. पण कोणाला माहित होते की दोन वर्षांपूर्वी रियानने पाहिलेले स्वप्न खरे होईल. क्रिकेटमध्ये चाहत्यांनी ६ चेंडूत ६ षटकार मारताना पाहिले आहेत. रियानने तर फक्त एका षटकात ४ षटकार मारण्याचे स्वप्न पाहिले होते, जे त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पूर्ण केले.
Riyan Parag right now pic.twitter.com/ACRxyRmmWR
— Sagar (@sagarcasm) May 4, 2025
मोईन अलीच्या षटकात ठोकले सलग ५ षटकार –
𝙍𝙖𝙢𝙥𝙖𝙣𝙩 𝙍𝙞𝙮𝙖𝙣 🔥
The #RR captain is in the mood tonight 😎
He keeps @rajasthanroyals in the game 🩷
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR | @rajasthanroyals | @ParagRiyan pic.twitter.com/zwGdrP3yMB
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
मोईन अलीने टाकलेल्या १३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरने एक धाव घेतली आणि रियान परागला स्ट्राईक दिली. यानंतर, रियानने घडवलेला कहर पाहून संपूर्ण केकेआर संघाला धक्का बसला. एकामागून एक, रियानने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चार षटकार मारले. शेवटच्या चेंडूवर मोईनने वाईड टाकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या मोईन अलीला रियानने सहाव्या चेंडूवर पाचवा षटकार खेचला. अशाप्रकारे रायनने मोईन अलीच्या एकाच षटकात पाच षटकार मारण्याचा पराक्रम केला.
हेही वाचा – PBKS vs LSG : प्रभसिमरन सिंगने केला नवा पराक्रम! गेल-राहुलच्या विक्रमांची केली बरोबरी
वरुण चक्रवर्तीविरुद्धही ठोकला षटकार –
#RR put on a superb fight 👏
And it all started when their captain Riyan Parag shifted the gears with 6️⃣ sixes in a 𝗥𝗢𝗪!
Watch his brutal hitting ▶ https://t.co/cJgk1XSmEm #TATAIPL | #KKRvRR | @ParagRiyan pic.twitter.com/UCkPjMc0pl
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
एवढेच नाही तर केकेआरकडून १४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या वरुण चक्रवर्तीविरुद्ध त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. अशाप्रकारे, रियान पराग आयपीएलमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा पहिला फलंदाज बनला आहे. याशिवाय, रियान आयपीएलमधील अशा फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे ज्यांनी एका षटकात पाच षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएलमध्ये पाच षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल, रवींद्र जडेजा, राहुल तेवतिया आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे.





