रितेश, विवेक आणि आफताबची पुन्हा ‘मस्ती 4’; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

Masti 4 Teaser | ‘मस्ती’ या सिनेमाचे 3 भाग आले असून चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी अभिनीत एडल्ट कॉमेडी फ्रँचायझीचा चौथा भाग चर्चेचा विषय ठरला आहे.
याचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले आहेत, ज्याद्वारे प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन मिळाले आहे. आता या सिनेमाचा चौथा भाग येत आहे. निर्मात्यांनी त्याची पहिली झलक टीझरच्या स्वरूपात शेअर केली आहे. झी स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनलने मस्ती 4 चा नवीन टीझर शेअर केला आहे. Masti 4 Teaser |
टीझरवरून असे दिसते की यावेळी कथा केवळ पुरुषचं नाहीत तर, महिला देखील विवाहबाह्य संबंधांमध्ये सहभागी होताना दिसणार आहेत. याचा अर्थ या चित्रपटात विनोद आणि ट्विस्टचा डबल डोस असेल. असे म्हटले जात आहे की मस्ती ४ ची कथा पहिल्या भागाप्रमाणेच थ्रिलर कॉमेडीवर आधारित असेल.
View this post on Instagram
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करण्यासाठी परतले आहेत. हे तिघे मित्र पुन्हा एकदा त्यांच्या पत्नींना सोडून इतर महिलांना शोधताना दिसत असतात, परंतु यावेळी, पत्नी आणि गर्लफ्रेंड यांच्यातला खेळ त्यांच्यासाठी खूप महागात पडणार आहे, हा अंदाज या टिझरवरुन लावता येतोय. Masti 4 Teaser |
‘मस्ती’ फ्रँचायझी 2004 मध्ये सुरू झाली. ‘ग्रँड मस्ती’ 2013 मध्ये आणि 2016 मध्ये’ ग्रेट ग्रँड मस्ती’ प्रदर्शित झाला. आता, नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित मस्ती 4 हा येत्या 21 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मस्ती ४ मध्ये रुही सिंग, एलनाज नोरोझी, आणि बिग बॉस 19 मधील स्पर्धक नतालिया जानौसेक सारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. याशिवाय अर्शद वारसी, जेनेलिया डिसूझा, नर्गिस फाखरी, तुषार कपूर आणि शाद रंधावा हे लोकप्रिय चेहरे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. Masti 4 Teaser |
हेही वाचा :
भारतातील एकमेव ज्वालामुखीचा उद्रेक ; अंदमानजवळ ४.२ तीव्रतेचा भूकंप





