रितेश आणि जिनिलीया एकत्र; ‘या’ चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा

Genelia-Ritesh Deshmukh | अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक मजेशीर व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होतात. दोघांचा ‘वेड’ हा सिनेमा चर्चेत होता. या चित्रपटानंतर आता दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
सध्या रितेश देशमुख त्याच्या आगामी चित्रपट ‘मस्ती 4’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून आता या चित्रपटात अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील झळकणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, दोघेही या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या ‘मस्ती 4’ या चित्रपटाचे शूटिंग हे परदेशात सुरु आहे. Genelia-Ritesh Deshmukh |
View this post on Instagram
सोशल मीडियावर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंग दरम्यान प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया देखील या व्हिडीओत दिसत आहेत. यावरून काही जणांनी जिनिलीया ‘मस्ती 4’ या चित्रपटात दिसणार असल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी ती फक्त चित्रपटाच्या सेटवर शूटिंग पाहण्यासाठी गेली असल्याचं म्हटलं आहे. मात्र यात ती डान्स करतानाही दिसत असल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. Genelia-Ritesh Deshmukh |





