Rishabh Pant Fifty : ऋषभ पंत नाव बदलून खेळला लोकल मॅच! २१ चेंडूंत कुटल्या ५४ धावा, विरोधी संघातील खेळाडूंनी ओळखलं पण नाही, पाहा VIDEO
Rishabh Pant Fifty : भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने न्यूझीलंडमध्ये एका स्थानिक सामन्यात भाग घेतला आणि अवघ्या २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले.

Rishabh Pant plays a local Christchurch cricket match as ‘Stan Stan’ : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा एक वेगळाच अंदाज क्राइस्टचर्चमध्ये पाहायला मिळाला. बुधवारी क्राइस्टचर्चच्या सेंट्रल परिसरात फिरत असताना ‘ओपन हाउस स्विंगर्स’ संघाचा खेळाडू मोहम्मद सफीने त्याला पाहिले आणि ओळखले. त्यांच्या संघाला एका खेळाडूची गरज असल्याने सफीने पंतला आपल्या संघाकडून खेळण्याबद्दल विचारले. त्यावर पंतनेही कोणताही विचार न करता आणि वेळ न दवडता लगेचच खेळण्यास होकार दिला.
‘स्टॅन स्टॅन’ नावाने ठोकले २१ चेंडूंत वादळी अर्धशतक –
यानंतर ऋषभ पंत हॅगली पार्कवर पोहोचला आणि ओपन हाउस स्विंगर्सकडून ‘द चोजन वन्स’विरुद्ध मैदानात उतरून अवघ्या २१ चेंडूंत ५४ धावा कुटल्या. स्कोरकार्डवर त्याचे नाव ‘स्टॅन स्टॅन’ लिहिले होते. न्यूझीलंड हेराल्डशी बोलताना सफी म्हणाला, “मी ऋषभला इलेक्ट्रिक बाईकवर फिरताना पाहून त्याच्यासोबत गप्पा मारल्या काही फोटो काढसे. खेळण्याबद्दल विचारताच तो म्हणाला, ठीक आहे, मी येऊन खेळतो. नंतर पॅड चढवून त्याने अनेक षटकार ठोकले.”
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी ऋषभला ओळखलेच नाही –
Open House Swingers were a player short for their match in Christchurch.
Then a mystery player scored 50 in 21 balls on his debut and finished with 72 runs off 26 balls. https://t.co/92SPM75b2g
— RP17 Gang™ (@RP17Gang) November 25, 2026
या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू ऋषभ पंतला ओळखू शकले नाहीत, अशी रंजक माहिती सफीने दिली. या सामन्यात पंतने आपल्या चुलत भावाच्या बॅटने फलंदाजी केली. सफी पुढे म्हणाला, “विरोधी खेळाडूंनी पंतला ओळखले नाही. तो मला एकेरी धाव आणि इतर गोष्टी करू दे म्हणत होता. मी त्याच्यापेक्षा लांब षटकार मारत होतो, तेव्हा तो म्हणाला, मलाही संधी दे, शॉट कसे मारतात ते दाखवतो.”
दुसऱ्या कसोटीत टीम इंडियासाठी पंत अत्यंत महत्त्वाचा –
Rishabh Pant Was Seen Playing For A Christchurch Social Team, & He Scored 54 Off Just 21 Balls 🤩
“Where Did You Guys Get This Player From? He Looks Like He Plays Div One Or Championship.” – An Opposite Team Player Said About Rishabh https://t.co/XlTnmqvAxu
— Khan (@Khanmohammed12) November 26, 2026
ऋषभ पंतच्या या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने हा स्थानिक सामना १६ धावांच्या फरकाने आपल्या नावे केला. आता न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दुसऱ्या कसोटी सामन्यातही हा यष्टिरक्षक फलंदाज टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीतही त्याने शानदार शतक ठोकले होते. विशेष म्हणजे, सर्व ‘सेना’ (SENA) देशांमध्ये कसोटी शतक झळकावणाऱ्या भारताच्या केवळ सहा निवडक क्रिकेटपटूंमध्ये ऋषभ पंतचा समावेश होतो.





