Rishabh Pant : ऋषभ पंतने ICC कसोटी क्रमवारीत रचला इतिहास! जे धोनीलाही जमलं नाही, ते करुन दाखवलं

लीड्स कसोटीत दोन्ही डावांत ठोकले शतक –
इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने १७८ चेंडूंमध्ये १३४ धावांची खेळी केली. यात १२ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. यानंतर दुसऱ्या डावातही त्याने धावांचा पाऊस पाडला. सामन्याच्या दुसऱ्या डावात पंतने १४० चेंडूंमध्ये ११८ धावा केल्या, ज्यात १५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. पंत हा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे, ज्याने कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावले.
आयसीसी कसोटी क्रमवारीत सोडली छाप –
Two centurions from the first #ENGvIND Test have reached career-best ratings in the latest ICC Men’s Player Rankings 👏
Read more ⬇️https://t.co/iRzq5boyLf
— ICC (@ICC) June 25, 2025
या दोन शतकांच्या जोरावर ऋषभ पंत यांनी आयसीसी क्रमवारीतही आपली छाप पाडली आहे. या सामन्यापूर्वी पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत आठव्या स्थानावर होता. आता त्याला एका स्थानाचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. सामन्यापूर्वी पंतची रेटिंग ७३९ होती, ती आता वाढून ८०० झाली आहे. उर्वरित चार कसोटी सामन्यांत पंत आणखी काही मोठ्या खेळी करू शकतात, ज्यामुळे त्याला आणखी फायदा होऊ शकतो.
हेही वाचा – Neeraj Chopra : नीरजचा गोल्डन स्पाइकवर कब्जा, पण स्वतःच्या कामगिरीवर का नाराज?
ऋषभ पंतने धोनीला टाकले मागे –
ऋषभ पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत ८०० रेटिंग पॉइंट मिळवणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताच्या कोणत्याही यष्टिरक्षकाने असा पराक्रम केला नव्हता. एमएस धोनीलाही त्याच्या कसोटी कारकीर्दीत कधीही ८०० रेटिंग पॉइंट्स मिळवता आले नव्हती, पण पंतने हा पराक्रम करून दाखवला आहे. आता पंत यापुढे जितका पुढे जाईल, तितके नवे विक्रम प्रस्थापित होत जातील. धोनीची सर्वोत्तम क्रमवारी १९ वी राहिली आहे, तर रेटिंगबाबत बोलायचे झाले तर त्यानी त्याच्या कारकीर्दीत ६६१ रेटिंग पॉइंटपर्यंत मजल मारली होती. त्याने सोटी क्रिकेटमध्ये सहा शतके झळकावली होती, हा विक्रम ऋषभ पंतने मागील सामन्यातच मोडला आहे.





