Pant Towel Video : श्रीलंकेतील कडक उन्हावर मात करण्यासाठी ऋषभ पंतचा देसी जुगाड, VIDEO होतोय व्हायरल
Pant Towel Video : कोलंबोतील कडक ऊन आणि दमट हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पंत सराव सत्रादरम्यान डोक्याला टॉवेल गुंडाळून मैदानावर उतरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rishabh Pant Towel Boy Avatar Viral Video Colombo Net Session ahead IND vs SL 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा आपल्या अनोख्या आणि बिनधास्त अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कोलंबोतील कडक ऊन आणि दमट हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पंत सराव सत्रादरम्यान (Net Session) डोक्याला टॉवेल गुंडाळून मैदानावर उतरला. त्याचा हा ‘टॉवेल बॉय’ (Towel Boy) अवतार पाहून क्रिकेट चाहते आणि सहकारी खेळाडूंचे हसू आवरता आले नाही.
डोक्याला गुंडाळला टॉवेल; भर उन्हात पंतची मजेशीर मस्ती!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, कोलंबोच्या तीव्र उन्हापासून वाचण्यासाठी पंतने आपला चेहरा आणि डोके पांढऱ्या टॉवेलने पूर्ण झाकून घेतले होते. नेट्समध्ये सपोर्ट स्टाफप्रमाणे टॉवेलच्या आतून चेहरा लपवत आणि बाहेर काढत तो खेळाडूंसोबत गंमत करताना दिसला. उन्हाचा चटका इतका असह्य होता की, काही सेकंदांसाठी टॉवेल बाजूला काढताच त्याला लगेच पुन्हा डोक्यावर टॉवेल गुंडाळावा लागला. त्याचा हा मजेशीर अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
क्रिकेट चेंडूला मारली फुटबॉलसारखी लाथ; स्टंप माईकमध्येही धुमाकूळ –
Look at Rishabh Pant. He is struggling with the Colombo heat.
The Ind vs Sl 2nd Test could be a challenging one for the players, as Colombo is currently experiencing intense heat.
(Credit: Ankan Kar) 🎥 pic.twitter.com/4nuwHwcMjJ
— Sonu (@Cricket_live247) August 22, 2026
प्रचंड उष्णतेच्या वातावरणातही पंतचा मूड नेहमीप्रमाणे हलकाफुलका आणि आनंदी पाहायला मिळाला. सरावादरम्यान फिरकी गोलंदाजाच्या चेंडूवर योग्य टायमिंग न साधता आल्याने त्याने चेंडूला थेट फुटबॉलप्रमाणे जोरात लाथ मारली, हे पाहून सराव पाहत असलेले श्रीलंकेचे खेळाडूही मनमुराद हसले. याशिवाय कसोटी सामन्यादरम्यान स्टंप माईकमध्ये कैद होणारी त्याची अनफिल्टर्ड कॉमेंट्री तसेच कर्णधार शुबमन गिल आणि सर्फराझ खानसोबतची त्याची जुगलबंदी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
नेटकरी म्हणाले, “तणाव कसा घालवायचा हे पंतकडून शिकावं!”
हा व्हिडीओ समोर येताच क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सामन्याचा कितीही प्रचंड दबाव असो किंवा श्रीलंकेची रखरखती उष्णता असो, संघातील वातावरण कसे हसतमुख आणि सकारात्मक ठेवायचे ही कला केवळ ऋषभ पंतलाच अवगत आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. पंतचा हा बिंधास्त स्वभाव ड्रेसिंग रूममधील ऊर्जा कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसते.





