रिंकू राजगुरुच्या सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ निवड; चित्रपटात साकारणार खास भूमिका

Rinku Rajguru | अभिनेत्री रिंकू राजगुरुला ‘सैराट’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. लहान वयातच तिने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. आता लवकरच तिचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्याची एका चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. यानिमित्त रिंकुने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. Rinku Rajguru |
रिंकूच्या या सिनेमाचे नाव ‘आशा’ असे असून यात ती एका आशा सेविकेची भूमिका साकारणार आहे. रिंकूने या सिनेमाचा पोस्टर शेअर करत लिहिले की, “नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही. तुमच्याबरोबर ही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे! आमचा ‘आशा’ चित्रपट प्रतिष्ठित ‘२१ व्या थर्ड आय एशियन’ चित्रपट महोत्सवाच्या ‘स्पर्धा’ विभागासाठी अधिकृतपणे निवडला गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो,” असे म्हणत तिने आपला आनंद व्यक्त केला. रिंकूच्या या पोस्टवर सेलिब्रिटीज आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदन केले आहे. Rinku Rajguru |
View this post on Instagram
‘आशा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बाळू पाटील यांनी केले असून दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात रिंकु राजगुरूसह शुभांगी भुजबळ, उषा नाईक, सुहास शिरसाठ, दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहेत. Rinku Rajguru |
रिंकू राजगुरुच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘सैराट’सह तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झिम्मा २’ या मराठीत सिनेमांत काम केले आहे. तर ‘२०० हल्ला हो’, ‘अनकहीं कहाँनिया, ‘झुंड’ या हिंदी सिनेमांत काम केले आहे. आता तिच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाची देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा :
IND vs AUS 5th Test: रोहितला वगळल्यानंतरही भारतीय संघाची तीच स्थिती, पहिला डावात 185 धावांवर गारद




