रिंकू राजगुरूने डेटिंगच्या चर्चांबाबत स्पष्टच सांगितले…

Rinku Rajguru | अभिनेत्री रिंकू राजगुरुला ‘सैराट या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यातील आर्ची या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटानंतर तिने मराठीसह हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. लवकरच ती अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासह ‘बेटर हाफची लव्ह स्टोरी’ या सिनेमात झळकणार आहे.
रिंकू राजगुरु सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने या प्लॅटफॉर्मवर Ask Me A Question या सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तिला प्रेमाविषयी काही प्रश्न देखील विचारण्यात आले. यावर देखील रिंकूने स्पष्ट उत्तरं दिली.
एकाने तिला विचारले की, ‘सोशल मीडियावर असा विषय सुरू आहे की, रिंकू डेटवर गेली आहे, तो खरा आहे का?’ त्यावर उत्तर देताना रिंकूने एका कॅफेमधील फोटो शेअर करत म्हटले की, ‘सोलो डेट’. म्हणजेच ती एकटीच या डेटसाठी गेली आहे.
शिवाय आणखी एकाने तिला विचारले की, ‘तिचा प्रेमावर विश्वास आहे का?’ त्यावर अभिनेत्रीने गुलाबांच्या फुलांचा फोटो शेअर करत ‘हो’ असे उत्तर दिले. अन्य एकाने तिला विचारले की, ती सिंगल आहे का? अभिनेत्रीने या प्रश्नाचे थेट उत्तर दिले आणि असे म्हटले की, ‘हो’. त्यामुळे रिंकू कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? असा वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर सिंगल असल्याचे तिने उत्तर दिले आहे.
रिंकूच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती शेवटचे ‘झिम्मा 2’मध्ये झळकली होती. तर तिचा ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ हा सिनेमा येत्या 22 ऑगस्ट रोजी रीलिज होणार आहे. Rinku Rajguru |
हेही वाचा :
मोठी बातमी..! शनी शिंगणापूर देवस्थानच्या उपकार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या





