Rahul Gandhi : “रिक्षाचालकांच्या उत्पन्नाचा मीटर बंद, महागाईचा ब्रेक फेल”; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल !
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रिक्षाचालकांच्या अडचणी शेअर करताना मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्पन्नाचा मीटर बंद.

Rahul Gandhi – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रिक्षाचालकांच्या अडचणी शेअर करताना मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्पन्नाचा मीटर बंद. महागाईचा ब्रेक फेल. मात्र, सरकार बहिरे अशा उपरोधिक शब्दांत ते सोशल मीडियावरून व्यक्त झाले.
राहुल यांनी शुक्रवारी दिल्लीत काही रिक्षाचालकांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत भोजन केले. संबंधित भेटीचा व्हिडीओ जारी करत राहुल यांनी सरकारवर निशाणा साधला. आम्ही उद्धवस्त झालो आहोत.
मात्र, आमचे गाऱ्हाणे ऐकणारे कुणी नाही अशी व्यथा एका रिक्षाचालकाने मांडली. त्या शब्दांमधून देशातील गरिबांची पूर्ण कहाणी समोर आली.
गॅस, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार, दूध, खाद्यतेलासाठीच्या खर्चात होणारी एक रूपयाचीही वाढ जनसामान्यांच्या बजेटवर थेट वार करणारा असतो, असे त्यांनी म्हटले. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही घेरले.
महागाई मानव मोदींनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला. तशा प्रकारच्या वाहतुकीचा कणा असणारे महागाईच्या ओझ्याखाली दबले आहेत. उद्याचे अन्न कुठून येणार असा प्रश्न त्यांना सतावत आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.






