पिंपरी | ‘मिसेस रायगड स्पर्धा’ रिया यांनी जिंकली

खालापूर, (वार्ताहर) – महिलांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या स्पर्धांपैकी एक मिसेस रायगड २०२४ ही सौंदर्य स्पर्धा खारघर येथे सुधांशू बालासिंग प्रेझेंट डी एस इंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून पार पडली. या स्पर्धेत खालापूरच्या रिया मालसुरे या विजेत्या ठरल्या आहेत. या स्पर्धेत राज्यातील जवळपास 57 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.
राज्यभरातून आलेल्या ५७ हून अधिक सौंदर्यवतींनी सौंदर्य आणि बुद्धीमत्ता या दोन्ही बाबतीत आपले कसब दाखविले.
या स्पर्धेत खालापूर तालुक्यातील कन्या रिया अजिंक्य मालुसरे हिने वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याने या रिया मालुसरे ही मिसेस रायगड या स्पर्धेची विजेती ठरली.
तर यावेळी सुधांशू बाळासिंग, दीपक शेट्टी, निशिता सुवर्णा, चार्ल्स विल्यम, सुम्या सिंग, पिंकी सुर्वे, रूची कुंभार, सुहेरुड वार्देकर, झिषण ठाकूर, शिव सिंघ आदि प्रमुखासह सिनेसृष्टी, ब्युटी इंडस्ट्री, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील दिगग्ज मान्यवर उपस्थित होते.
रिया मालुसरे म्हणाल्या की, नटणे – सजने- सावरणे हा महिलांचा नैसर्गिक गुणधर्म आहे. महिलांच्या याच कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक जण नेहमी अग्रेसर असतात.
अ.िलकडे सौंदर्य स्पर्धा ह्या फक्त स्त्री वर्गापुरत्या मर्यादित न राहता लहान मुले, पुरुष यांमध्येही होतात. सौंदर्य स्पर्धांचे स्वरूप शारीरिक सौंदर्य एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता सौंदर्यवतींचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता यांच्या मूल्यमापनावर आधारित असते.



